Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नवी मुंबई पोलीसांची मोठी कामगिरी; २६ कोटींचे अमली पदार्थ नष्ट

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 27, 2025
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
नवी मुंबई पोलीसांची मोठी कामगिरी; २६ कोटींचे अमली पदार्थ नष्ट
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : ‘नशा मुक्त नवी मुंबई ‘ या अभियाना अंतर्गत पोलिसांनी कारवाई करून, जप्त केलेले २६ कोटी ८४ लाख रुपयांचे अमली पदार्थ, नवी मुंबई पोलिसांनी तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट येथे नष्ट केले आहेत. यावेळी आमदार मंदा म्हात्रे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निगडे, यांसह मुंबई वेस्ट मॅनेजमेंटचे अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई शहरातील युवा पिढी नशेच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ नये, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी नशा मुक्त नवी मुंबई ही मोहीम उभारली. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी मोठमोठे दिग्गज व सुप्रसिद्ध अभिनेत्यांना बोलवण्यात आले. याच जनजागृती सोबत नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईचा धडाका सुरू केला. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईच्या सक्त सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत कमी किमती पासून ते लाखो करोड रुपयांचे अंमली पदार्थ हस्तगत केले होते. या कारवाईत अनेक आरोपींना अटक करून त्यांना गजाआड केले. यामध्ये परदेशी आरोपींचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. नवी मुंबई परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या १०३ आफ्रिकन नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यातील ९६ जणांना देशातून हद्दपार करण्यात आले आहे. उर्वरित आरोपींवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

Previous Post

आत्महत्या की घातपात? डोंबिवलीत ११ मजल्यावरून २२ वर्षीय तरुणाने मारली उडी

Next Post

ठाण्यात २६४ अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई

Next Post
ठाण्यात २६४ अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई

ठाण्यात २६४ अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.