Lokrakshanay
Sunday, April 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाण्यात २६४ अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 29, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाण्यात २६४ अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश, प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांनी केलेल्या पाहणीत तसेच दिवा आणि मुंब्रा येथील विशेष दक्षता पथकांच्या पाहणीत आढळलेल्या एकूण २६४ अनधिकृत बांधकामांवर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आतापर्यंत कारवाई केली आहे. त्यापैकी १९८ बांधकामे पूर्णपणे पाडण्यात आले आहेत. तर, ६६ बांधकामांमधील अनधिकृत वाढीव बांधकाम हटवण्यात आले आहे. तसेच अनधिकृत बांधकाम प्रकरणी ठाणे महापालिकेने जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत एकूण ५० गुन्हे दाखल केले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात जून महिन्यापासून अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या कारवाईचा आढावा घेतला. या आढावा बैठकीस, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक नगररचना संचालक संग्राम कानडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, विधी अधिकारी मकरंद काळे, सर्व प्रभाग समितीचे सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते. कोणतेही अनधिकृत बांधकाम सुरू राहू नये यासाठी सर्व यंत्रणेने दक्ष राहावे. तसेच, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक त्या प्रकरणात तातडीने ‘एमआरटीपी’अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. गुन्हे दाखल करताना प्रत्यक्ष पाहणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक माहिती नोंदवावी, असेही त्यांनी सांगितले. ज्या अनधिकृत बांधकामांचे पाडकाम शिल्लक असेल त्याचे प्रवेश मार्ग (जिने) पाडून पत्रे लावून बंद करावेत, असेही त्यांनी म्हटले. तसेच, अनधिकृत बांधकामात घर घेऊ नये असे आवाहन करणारे फलक मोक्याच्या जागी उभे करावे. नागरिकांनाही घर खरेदी करताना बांधकाम अधिकृत असल्याची खात्री महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 

Previous Post

नवी मुंबई पोलीसांची मोठी कामगिरी; २६ कोटींचे अमली पदार्थ नष्ट

Next Post

बड्या कंपन्यांकडून आयटी कर्मचाऱ्यांवर अन्याय; जबरदस्तीचे राजीनामे, धमक्या आणि अपमानास्पद वागणूक

Next Post
बड्या कंपन्यांकडून आयटी कर्मचाऱ्यांवर अन्याय; जबरदस्तीचे राजीनामे, धमक्या आणि अपमानास्पद वागणूक

बड्या कंपन्यांकडून आयटी कर्मचाऱ्यांवर अन्याय; जबरदस्तीचे राजीनामे, धमक्या आणि अपमानास्पद वागणूक

BreakingNews

भक्तीसोबतच आता जनसेवा! दगडूशेठ ट्रस्टकडून गरजूंसाठी आता मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू

वसई-विरारमध्ये भटक्या श्वानांसाठी उभारणार ४४ ‘डॉग फीडिंग स्पॉट’!

आता रेशनवर धान्यच नाही, साडीही मिळणार! – राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ची धडाक्यात तयारी; डिजिटल प्रक्रियेसाठी प्रगणक-पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

ई-केवायसीअभावी शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन थांबणार?

PF Withdrawal Update: आता ATM मशीनमध्ये कार्ड टाका आणि PF चे पैसे मिळवा!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.