Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अभिलेख्याचे स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख होईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली व रुग्णांकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचे केले उद्घाटन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 2, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अभिलेख्याचे  स्कॅनिंग आणि  डिजिटायजेशन धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख होईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यातील धर्मादाय कार्यालयाचे काम कौतुकास्पद आहे. विभागांनी किती काम केले यापेक्षा किती लोक लोकाभिमुख काम करत आहेत, हे महत्त्वाचे असून विभागाने अधिकाधिक लोकाभिमुख कामे करावीत, असे उपमुख्यमंत्री तथा विधि व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

“उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली,  रुग्णांकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचे उद्घाटन या कक्षाच्या उदघाटनासोबतच धर्मादाय रुग्ण योजनेच्या अंमलबजावणीकरीता ऑनलाईन प्रणाली, रुग्णाकरिता 24 तास हेल्पलाईन सुविधा, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कागदपत्रे  स्कॅनिंग आणि  डिजिटायजेशन या उपक्रमाचे उद्घाटन  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी येथील सस्मिता इमारतीत झाले, त्यावेळी श्री फडणवीस बोलत होते. यावेळी विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव उदय शुक्ल , धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, पद्मश्री डॉ तात्यासाहेब लहाने, उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा मोफत व सवलतीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय संघटना आणि वैद्यकीय कक्ष समन्वयाने काम करीत आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कागदपत्रे  स्कॅनिंग आणि  डिजिटायजेशन या उपक्रमामुळे सुनावणी अधिक सुकर होण्यास मदत होणार असून वेग आणि पारदर्शकता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वैद्यकीय मदत कक्ष स्थापनेमुळे धर्मादाय रुग्ण योजनेची प्रभावी अंमलबजावणी होईल. धर्मादाय रुग्णालयातील राखीव खाटांचे कक्षाकडून वाटप होणार असल्याने सर्व गोरगरीब रुग्णांना खात्रीशीर मोफत, सवलतीच्या दरातील उपचाराकरिता बेड उपलब्ध होणार आहे. गरीब रुग्णांना मोफत तसेच सवलतीच्या दरात उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे सुकर होणार आहे. तसेच रूग्णांना शासनाच्या विविध योजना जसे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, पीएम केअर फंड, मुख्यमंत्री सहायता निधी यांचे वैद्यकीय सहायक कक्षामार्फत मिळवून देण्यात येत आहे. वैद्यकीय साहाय्य करणाऱ्या विविध धर्मादाय संस्थेकडून  मदत मिळवून दिली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

ऑनलाईन प्रणालीमुळे योजनेचा लाभ घेण्याकरिता या प्रणाली मार्फत  कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी होणार असल्याने खऱ्या गरजू रूग्णांना योजनेचा लाभ मिळणार आहे. धर्मादाय रुग्ण योजनेतील खाटांच्या वितरणात सु-सूत्रीकरण येईल. योजनेचा लाभ घेण्याकरिता या प्रणालीद्वारे जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धर्मादाय रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष यांच्या मार्फत करता येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता निर्माण होणार. धर्मादाय योजनेतील रिक्त खाटांची रिअल टाईम माहिती रुग्णांना उपलब्ध होईल, खऱ्या गरजू रुग्णांना योजनेचा लाभ मिळेल असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

वैद्यकीय मदत कक्षाचे औपचारिक उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  उद्घाटनपूर्वीच कक्षाचे कामकाज सुरू झाले असून गेल्या 10 महिन्यात कक्षामार्फत 323 रुग्णांना गंभीर आजारांसाठी मदत करण्यात आली असून मदतीची रक्कम  12 कोटी 73 लक्ष एवढी असल्याचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले. https://charitymedicalhelpdesk.maharashtra.gov.in/ या संकेत स्थळास भेट दिल्यावर राज्यातील धर्मादाय रुग्णालये, त्यांच्याकडील राखीव बेडची संख्या, यांची माहिती मिळणार आहे.

Previous Post

‘कच-याचे योग्य वर्गीकरण होणे गरजेचे’ कचरा व्यवस्थापन चर्चासत्रात तज्ज्ञांचा सूर स्वच्छता ही सेवा अभियानातंर्गत चर्चासत्राचे आयोजन

Next Post

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ४३१ ग्रामपंचायतींमध्ये साजरा केला स्वच्छ भारत दिवस

Next Post
जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ४३१ ग्रामपंचायतींमध्ये साजरा केला स्वच्छ भारत दिवस

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ४३१ ग्रामपंचायतींमध्ये साजरा केला स्वच्छ भारत दिवस

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.