Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाण्यात महिलांना ५० टक्के सवलत, ज्येष्ठांना मोफत बस प्रवास

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने अर्थसंकल्पामध्ये ४२७ कोटी १८ लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी पालिकेकडे केली होती. परंतु पालिका प्रशासनाने केवळ दोनशे कोटींचे अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 8, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाण्यात महिलांना ५० टक्के सवलत, ज्येष्ठांना मोफत बस प्रवास
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने ४२७ कोटी रुपयांच्या अनुदानांची मागणी पालिका प्रशासनाकडे केली असली तरी प्रत्यक्षात मात्र पालिका प्रशासनाने निम्म्याहून कमी म्हणजेच दोनशे कोटींचे अनुदान देण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. या अर्थसंकल्पात ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना मोफत तर, महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत देण्याचे जाहीर करत महिलांसाठी बसगाड्यांमधील डाव्या बाजूकडील आसने आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण ३६४ बसगाड्या आहेत. त्यापैकी उपक्रमाच्या स्वत:च्या १२४ बसगाड्या आहेत. तर, उर्वरित २२० बसगाड्या ठेकेदारामार्फत जीजीसी तत्वावर चालविण्यात येत आहेत. एकूण ३६४ पैकी ३०० बसगाड्या प्रत्यक्षात प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत आहेत. ठाणे शहराची लोकसंख्या मागील काही वर्षांपासून वाढत आहे. सध्या शहराची लोकसंख्या २० ते २५ लाखांच्या घरात गेली आहे. असे असले तरी प्रवासी संख्येच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या अपुरी आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका तसेच परिवहन प्रशासनाने बसगाड्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला असून त्याचबरोबर प्रवाशांना चांगली सोयीसुविधा मिळावी, यावर लक्ष केंद्रीत आले आहे.

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने अर्थसंकल्पामध्ये ४२७ कोटी १८ लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी पालिकेकडे केली होती. परंतु पालिका प्रशासनाने केवळ दोनशे कोटींचे अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. टिएमटीच्या ताफ्यात पर्यावरणपुरक बसगाड्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू असून यातूनच खरेदी करण्यात आलेल्या १२३ विद्युत बसगाड्या टिएटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आणखी ८६ विद्युत बसगाड्या टिएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. याशिवाय, पीएम-ई योजनेतून १०० बसगाड्या टिएमटीला मिळणार आहेत. यामुळे टिएमटीच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या ६०० च्या आसपास होणार असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. टिएमटीच्या बसगाड्या जीसीसी तत्वावर चालविण्यात येतात. यामध्ये ठेकेदाराला प्रति किलोमीटर प्रमाणे देयक देण्यात येते. परंतु घनकचरा विभागाप्रमाणेच याठिकाणी ठेकेदाराकडून देण्यात येणारी बस सुविधेच्या आधारे देयक देण्याचा विचार पालिका करित आहे. यामध्ये बसगाड्या स्वच्छ आहेत का, प्रवाशांना वेळेत उपलब्ध होतात का, बसगाड्या स्वच्छ आहेत का आणि प्रवाशांना चांगली सुविधा मिळते का, याचा विचार करून देयके दिली जाणार आहेत.

Previous Post

सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा डीआरआयच्या विभागाने केला पर्दाफाश, १६ किलो सोने केले जप्त

Next Post

होळी विशेष मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेच्या रेल्वेगाड्या

Next Post
होळी विशेष मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेच्या रेल्वेगाड्या

होळी विशेष मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेच्या रेल्वेगाड्या

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.