मुंबई : मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यास मदत होईल. अहमदाबाद – मडगाव, एलटीटी – थिवी, पनवेल – सावंतवाडी, उधना – मंगळुरू, सुरत – करमळी होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या अहमदाबाद – मडगाव होळी विशेष गाड्या १९ मार्च २०२४ पासून चालविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०९४१२ अहमदाबाद – मडगाव (वसई रोडमार्गे) होळी विशेष रेल्वेगाडी १९ आणि २६ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता सुटेल. तर, मडगावला दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता पोहचेल. गाडी क्रमांक ०९४११ मडगाव – अहमदाबाद होळी विशेष रेल्वेगाडी २० आणि २७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी अहमदाबादला सकाळी ७ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला वडोदरा, सुरत, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी आणि करमळी येथे थांबे देण्यात येतील. या दोन्ही रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे.
गाडी क्रमांक ०११८७ एलटीटी – थिवि विशेष रेल्वेगाडी १४, २१ आणि २८ मार्च रोजी रात्री १०.१५ वाजता सुटेल. तर, गाडी क्रमांक ०११८८ थिवी – एलटीटी विशेष रेल्वेगाडी १५, २२, २९ मार्च रोजी दुपारी ४.३५ वाजता सुटेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकावर थांबेल.गाडी क्रमांक ०१४४४ सावंतवाडी रोड – पनवेल विशेष (साप्ताहिक) १२, १९ आणि २६ मार्च रोजी सावंतवाडी रोडवरून रात्री ११.२५ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०१४४३ पनवेल – सावंतवाडी रोड विशेष (साप्ताहिक) पनवेल येथून १३, २० आणि २७ मार्च रोजी सकाळी ९.४० वाजता सुटेल. ही गाडी कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड आणि रोहा या स्थानकांवर गाडी थांबेल.गाडी क्रमांक ०९०५७ उधना – मंगळुरू होळी विशेष रेल्वेगाडी २० आणि २४ मार्च रोजी रात्री ८ वाजता सुटेल. तर, गाडी क्रमांक ०९०५८ मंगळुरू – उधना होळी विशेष रेल्वेगाडी २१ आणि २५ मार्च रोजी रात्री १० वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०९११३ सुरत – करमळी होळी विशेष रेल्वे गाडी २१ आणि २८ मार्च रोजी सायंकाळी ७.५० वाजता सुटेल. तर, गाडी क्रमांक ०९११४ करमळी – सुरत होळी विशेष रेल्वेगाडी २२ आणि २९ मार्च रोजी सकाळी ८.४५ वाजता सुटेल.