Lokrakshanay
Tuesday, September 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

गुंतवणुकीच्या आमिषाने ३६ जणांची कोटींची फसवणूक; सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 17, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
गुंतवणुकीच्या आमिषाने ३६ जणांची कोटींची फसवणूक; सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : नवी मुंबईत चिटफंड घोटाळा समोर आला असून गुंतवणूक रकमेवर ९ % व्याज देण्याचे आमिष दाखवून ३६ जणांची १ कोटी ४८ लाख ५० हजार ९६० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेली रक्कम आणि फिर्यादी यांची संख्या वाढू शकते अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या इच्छेने अनेकदा आमिषाला लोक बळी पडत असल्याचे चित्र सर्रास दिसत आहे. वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक चॅनल्स वरील बातम्या , समाज माध्यमातून दिली जाणारी माहिती आणि पोलिसांनी वेळोवेळी केलेले आवाहन या सर्वाकडे दुर्लक्ष करीत अनेक जण अशा ठिकाणी गुंतवणूक करतात आणि शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. असाच प्रकार नवी मुंबईतील ऐरोली येथे समोर आला आहे.

सुप्रिया पवार उर्फ सुप्रिया मेहेर, सागर मेहेर, सुभाष पवार प्रशांत पवार नीतिम पवार आणि तृप्ती पवार यांनी मिळून चिटफंड कंपनी सुरु केली. यातील सुप्रिया पवार उर्फ सुप्रिया मेहेर यांनी अन्य संशयित आरोपींना हाताशी धरून हि कंपनी सुरु केली. या चिटफंड मध्ये कमीत कमी ५० हजार रुपयांची गुंतवणूक करा ४५ दिवसात ९ ते १२ % हमखास परतावा दिला जाईल असे आमिष दाखवले गेले. तशी जाहिरात बाजी केल्याने त्याला बळी पडून ३६ जणांनी त्यांच्या कडे गुंतवणूक केली. यात ५० हजार ते ५ लाख पर्यंत लोकांनी पैसे गुंतवले असून हि रक्कम १ कोटी ४८ लाख ५० हजार ९६० एवढी आहे. हा प्रकार २०२० पासून सुरु आहे. या दरम्यान अनेकांनी त्यांच्या कडे पैसे गुंतवले आहेत. त्यातील रोहन कोल्हे यांनी फिर्याद दिली असून त्याची पडताळणी करून सोमवारी या प्रकरणी संशयित सहा आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. आता पर्यंत ३६ जणांनी तक्रार केली असेल तर त्यात नक्कीच वाढ होऊ शकते त्यामुळे या ठिकाणी पैसे गुंतवले असेल तर पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद भोसले तपास करीत आहेत.

Previous Post

ठाणे जिल्हा प्रशासनाची महत्त्वाकांक्षी मोहीम ‘सेवा पंधरवडा’; सामान्य जनतेची कामे वेगवान

Next Post

साप चावल्याचा आरडाओरडा करत वांद्रे-वरळी सीलिंकवरून व्यावसायिकाने मारली समुद्रात उडी; तब्बल सहा तासांनी आढाळला मृतदेह

Next Post
साप चावल्याचा आरडाओरडा करत वांद्रे-वरळी सीलिंकवरून व्यावसायिकाने मारली समुद्रात उडी; तब्बल सहा तासांनी आढाळला मृतदेह

साप चावल्याचा आरडाओरडा करत वांद्रे-वरळी सीलिंकवरून व्यावसायिकाने मारली समुद्रात उडी; तब्बल सहा तासांनी आढाळला मृतदेह

BreakingNews

आता रिक्षात बसण्यापूर्वीच कळणार भाडे; ठाणे रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा सेवेला सुरुवात!

राजा शिवछत्रपती मंडळाचा ‘माऊली… एक दिव्य प्रवास’ देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!

गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाची भररस्त्यात चाकूने हत्या; मुख्य सूत्रधारासह ७ आरोपींना अटक

उल्हास नदीला मिळाले ‘जीवनदान’; गणेशोत्सवात तब्बल २,०७० किलो निर्माल्य संकलित!

ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूल काँग्रेसमधील बंडानंतर पक्षाचे अधिकृत चिन्ह गोठवले

गणेशोत्सवात दादरच्या उद्यान गणेश मंदिराला महापालिकेची नोटीस; अनधिकृत शेड आणि स्टॉल्स हटवण्याचे आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.