Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

साप चावल्याचा आरडाओरडा करत वांद्रे-वरळी सीलिंकवरून व्यावसायिकाने मारली समुद्रात उडी; तब्बल सहा तासांनी आढाळला मृतदेह

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 18, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
साप चावल्याचा आरडाओरडा करत वांद्रे-वरळी सीलिंकवरून व्यावसायिकाने मारली समुद्रात उडी; तब्बल सहा तासांनी आढाळला मृतदेह
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : साप चावल्याचा आरडाओरडा करत वांद्रे-वरळी सीलिंकवर व्यावसायिकाने टॅक्सी थांबवली आणि समुद्रात उडी मारल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला. व्यावसायिक अमित शांतीलाल चोप्रा (४७) यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय होता. व्यावसायिक कारणामुळे त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांना त्यांच्याकडे कोणतीही चिठ्ठी सापडली नाही, त्यामुळे कुटुंबियांकडून माहिती घेतल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

चोप्रा मूळचे राजस्थान येथील रहिवासी असून त्यांचे सर्व नातेवाईक तेथेच वास्तव्यावला आहेत. चोप्रा पत्नी व मुलांसोबत मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे वास्तव्याला होते. तसेच मुंबईतच इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करीत होते. मंगळवारी मध्यरात्री १ वाजता चोप्रा यांनी टॅक्सी पकडली. वांद्रे मार्गे टॅक्सी सीलिंकवर आल्यानंतर आपल्याला साप चावला असा आरडाओरडा चोप्रा यांनी केला. त्यामुळे घाबरून टॅक्सी चालकाने टॅक्सी बाजूला थांबवली. त्यानंतर चोप्रा यांनी टॅक्सीचा दरवाजा उघडला व त्यांनी सीलिंकवरून समुद्रात उडी मारली. याप्रकारामुळे टॅक्सी चालक घाबरला व त्याने तात्काळ हा प्रकार सीलिंक कर्मचारी व पोलिसांना सांगितला. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी चोप्रा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून शोधमोहीम सुरू केली. पण अंधार असल्यामुळे चोप्रा सापडले नाहीत.

समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या दोन मच्छीमारांना बुधवारी सकाळी मृतदेह तरंगताना दिसला. सांताक्रुझ किनाऱ्यावर होडी पोहोचल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सांताक्रुझ पोलिसांचे पथक मच्छीमार व अग्निशमन दलाच्या मदतीने समुद्रात पोहोचले. मच्छीमारांनी मृतदेह पाहिलेल्या ठिकाणी पोलिसांना नेले. तेथून मृतदेह किनाऱ्यावर आणण्यात आला. त्यानंतर मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. डॉक्टरांनी तपासणी करून त्या व्यक्तीचा फार पूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. चोप्रा कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे अद्याप त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. तसेच चोप्रा यांनी मृत्युपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यू कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान राजस्थान येथूनही त्याचे इतर कुटुंबिय मुंबईत येण्यासाठी निघाले असून त्यांच्याकडूनही पोलीस अधिक माहिती घेणार आहेत.

Previous Post

गुंतवणुकीच्या आमिषाने ३६ जणांची कोटींची फसवणूक; सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

Next Post

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन

Next Post
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.