Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी यशश्री शिंदे खून प्रकरण…..

कर्नाटक येथील मूळ गावी गेल्याची शक्यता वर्तवली होती. दाऊदला अटक करण्यात आली

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 31, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी यशश्री शिंदे खून प्रकरण…..
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : उरण येथील युवतीच्या हत्येप्रकरणी दाऊद शेख याला कर्नाटकमधून अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे दीपक साकोरे यांनी सांगितले. दरम्यान, पनवेल सेशन कोर्टाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. युवतीच्या पालकांनी २५ जुलै रोजी उरण पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांना उरण रेल्वे स्थानक परिसरात तिचा मृतदेह आढळून आला. तपासात दाऊद शेख नावाच्या युवकाचा व तिचा दूरध्वनी झाल्याचे समोर आले. दाऊद हा उरणमध्ये आढळला नाही. तो कर्नाटक येथील मूळ गावी गेल्याची शक्यता वर्तवली होती. दाऊदला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस अधिकारी साकोरे यांनी सांगितले की, दाऊद आणि ही युवती यांची ओळख होती. ते एकाच शाळेत होते. दाऊद करोनाकाळात कर्नाटकमध्ये गेल्याने त्यांचा संपर्क तुटला होता. सध्या तरी यात तो एकच आरोपी असून गुन्ह्यात त्याला कोणी मदत केली का, याशिवाय हत्येचे नेमके कारण काय आहे, आदी प्रकरणी तपास सुरू आहे, असे साकोरे यांनी सांगितले. ही युवती अल्पवयीन असताना दाऊदविरोधात तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. “माझ्या मुलीला जेवढा त्रास झाला तेवढंच त्यालाही टॉर्चर करून फाशी दिली पाहिजे. हे प्रकरण फॅस्ट ट्रॅकवर चालवलं पाहिजे. माझ्या मुलीप्रमाणे ज्या मुली तडफडून गेल्या आहेत, त्यांनाही न्याय द्या. म्हणजे माझ्या लेकीलाही समाधान मिळेल. पण माझ्या मुलीला त्याने जेवढा त्रास दिला तेवढाच त्रास त्याला द्या आणि फाशी द्या. सध्या प्रकरण चर्चेत आहे म्हणून शिक्षेचं आश्वासन दिलं जाईल. पण त्याला फाशी दिलीच पाहिजे”, अशी प्रतिक्रिया यशश्रीच्या आईने दिली.

Previous Post

प्रशासनाला नागरिकांचा इशारा; घंटा गाडीला प्रवेश नाही

Next Post

महाप्रीतचा ठाणे मनपाला प्रस्ताव, जमीन गहाण ठेवून घेणार २५४६ कोटीचे कर्ज

Next Post
महाप्रीतचा ठाणे मनपाला प्रस्ताव, जमीन गहाण ठेवून घेणार २५४६ कोटीचे कर्ज

महाप्रीतचा ठाणे मनपाला प्रस्ताव, जमीन गहाण ठेवून घेणार २५४६ कोटीचे कर्ज

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.