Lokrakshanay
Thursday, August 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

प्रशासनाला नागरिकांचा इशारा; घंटा गाडीला प्रवेश नाही

वागळे इस्टेट येथील कचरा हस्तांतरण केंद्र हटविण्यासाठी घंटा गाडीला प्रवेश नाही

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 30, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
प्रशासनाला नागरिकांचा इशारा; घंटा गाडीला प्रवेश नाही
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे: शहरातील कचरा उचलला जात नसल्यामुळे अनेक गृहसंकुलांबाहेरील पिपांमध्ये कचरा ढिग लागत असतानाच, वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसरात असलेले कचरा हस्तांतरण केंद्रावरील कचऱ्याचा ढीग दिवसेंदिवस वाढत असून याठिकाणी मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या परिसरात घंटा गाड्यांना प्रवेश देणार नसल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे शहरात पुन्हा कचरा कोंडी होण्याची चिन्हे दिसून येत आहे. वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसरात असलेल्या पालिकेच्या या कचरा हस्तांतरण केंद्रावर शहरातील विविध भागातील कचऱ्याचे संकलन करुन त्याचे वर्गीकरण करण्यात येते. याठिकाणी कचऱ्याचे ढीग लावले जातात. हा ढीग दिवसेंदिवस वाढत असून या परिसरात मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरल्याचे येथील रहिवाशांकडून सांगण्यात येत आहे. कचरा हस्तांतरण केंद्राजवळ लोकवस्ती,मोठमोठे गृहसंकुले तसेच औद्योगिक कंपन्या आहेत. कचरा हस्तांतरण केंद्रामुळे परिसरात पसरलेल्या दुर्गंधी आणि घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढला असून परिसरातील रहिवाशी तसेच कामानिमित्त येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाच्या दिवसात साथीचे आजार पसरण्याचे प्रमाण सर्वाधिक असते आणि त्यात या कचरा हस्तांतरण केंद्रावर साचत असलेल्या कचऱ्याच्या ढीगमुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

अरुंद असलेल्या येथील रस्त्यांवरुन दिवसभर घंटा गाड्यांची वाहतुक सुरु असते. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होते. या कोंडीचा फटका या परिसरातून ये-जा करणाऱ्या टीएमटी बस गाड्यांना तसेच नागरिकांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात, येथील सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बचाटे यांनी महापालिकेला वारंवार पत्रव्यवहार करुनही महापालिकेकडून यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र,यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे बचाटे यांनी सांगितले. गेले दोन महिन्यांपासून कचऱ्याचा ढीग मोठ्याप्रमाणात वाढला आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना परिसरात वावरणे कठीण झाले आहे. याठिकाणी कचऱ्याचा ढीग आणखी वाढू नये यासाठी या परिसरात घंटागाडीला आतमध्ये प्रवेश देणार नाही असा इशारा येथील रहिवाश्यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे शहरातील कचरा कुठे जमा होणार असा प्रश्न निर्माण झाला असून पुन्हा एकदा शहात कचऱ्याची समस्या निर्माण होणार आहे.

Previous Post

उल्हासनगर : व्यवसायातील गुंतवणुकीच्या माध्यमातून ३१ लाखाची फसवणूक

Next Post

आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी यशश्री शिंदे खून प्रकरण…..

Next Post
आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी यशश्री शिंदे खून प्रकरण…..

आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी यशश्री शिंदे खून प्रकरण.....

BreakingNews

आता प्रत्येक आमदाराला मिळणार हक्काची गाडी आणि दरमहा १ लाख रुपये; तमिळनाडू सरकारची मोठी घोषणा

FDAच्या कडक कारवाईचा परिणाम; चायनीजमध्ये लाल रंगासाठी आता बीट आणि काश्मिरी मिरचीचा वापर

ठाण्यात आरटीओचे ‘मिशन मराठी’ला सुरुवात; पहिल्याच दिवशी ६ ठिकाणी तपासणी मोहीम!

वडा-पावऐवजी इडली-डोसा अन् कोलाऐवजी ताक; FDAच्या निर्देशानंतर शालेय कँटीनमध्ये आरोग्याला प्राधान्य

हॉकी विश्वचषकातही भारताचाच बोलबाला! पाकिस्तानचा ५-३ ने पराभव करत टॉप-८ मध्ये दमदार प्रवेश

मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच धावणार १५० नवीन आलिशान डबलडेकर एसी बसेस

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.