Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

महाप्रीतचा ठाणे मनपाला प्रस्ताव, जमीन गहाण ठेवून घेणार २५४६ कोटीचे कर्ज

ठाणे महापालिका क्षेत्रात सिडको पाठोपाठ महाप्रीत संस्थेकडून समुह पुनर्विकास योजनेतर्गंत किसननगर भागात इमारती उभारण्याची काम करण्यात येणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 31, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
महाप्रीतचा ठाणे मनपाला प्रस्ताव, जमीन गहाण ठेवून घेणार २५४६ कोटीचे कर्ज
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सिडको पाठोपाठ महाप्रीत संस्थेकडून समुह पुनर्विकास योजनेतर्गंत किसननगर भागात इमारती उभारण्याची काम करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्राद्योगिकी मर्यादित (महाप्रीत) या शासकीय कंपनीला २,५४६ कोटीचे कर्ज घेण्याकरिता पालिकेची जमीन आणि भविष्यात त्यावर निर्माण होणारी वास्तु गहाण ठेवावी लागणार आहे. यासाठी ना हरकत दाखला देण्यासंबंधीचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी पाठविण्यास पालिकेच्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. यावर शासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती पावसाळय़ात कोसळून जीवितहानी होते. अशा घटना टाळण्यासाठी अनधिकृत आणि अधिकृत इमारतींचा सुनियोजित तसेच संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी ४५ नागरी पुनरुत्थान आराखडे ठाणे महापालिकेने तयार केले होते. पहिल्या टप्प्यात किसननगर भागात सिडकोच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत असून याठिकाणी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना हक्काची आणि मालकी घरे मिळणार आहे. त्याचबरोबर महाप्रीत या शासकीय कंपनीच्या माध्यमातून ठाणे शहरातील टेकडी बंगला, हजुरी आणि किसननगरमधील उर्वरित भागात समुह विकास प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यासाठी महाप्रीतने ठाणे महापालिकेबरोबर सामंजस्य करार केला आहे. किसननगर येथील नागरी पुनरुत्थान आराखडा क्रमांक १२ अतंर्गत येणाऱ्या युआरसी क्रमांक पाच आणि सहा येथे समुह योजनेच्या अंमलबजावणीचे काम महाप्रीत कंपनी करणार आहे.

या प्रकल्पासाठी महाप्रीत एचयुडीसीको कडून २,५४६ कोटी रुपयांचे कर्ज घेणार असून त्यासाठी महाप्रीत पालिकेची जमीन गहाण ठेवणार आहे. तसा प्रस्ताव महाप्रीतने पालिका प्रशासनाला दिला होता. परंतु महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ७९(सी) अंतर्गत महापालिका स्तरावर किंवा आयुक्तांच्या स्तरावर गहाण ठेवणे विषयी कोणतीही स्पष्ट तरतुद नाही. महाराष्ट्र अधिनियमातील कलम ७९ (सी) व ७९ (जी) (३) नुसार सर्वसाधारण सभेची पुर्वमान्यता घेऊन ठाणे महापालिकेची जमीन व भविष्यात त्यावर निर्माण होणारी वास्तु गहाण ठेवण्यासाठी शासनाची पुर्वमान्यता घेण्यास आयुक्तांनी मान्यता दिली असून या प्रस्ताव प्रशासकीय सभेनेही नुकतीच मान्यता दिल्याने तो आता शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.

समुह पुनर्विकास योजनेसाठी ठाणे येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रेखांकनातील भुखंड क्रमाक एफ-१ व सी-२९ या भुखंडाच्या एकूण जमीनीपैकी ५० टक्के जमीन म्हणजेच २२,३१७.६० चौ.मी इतके क्षेत्र त्रिपक्षीय करारनामान्वये ठाणे महापालिकेच्या नावे करण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या शासन निर्णयानुसार कृषी विभागाची १.९३२ हेक्टर इतकी जमीन ठाणे महापालिकेच्या नावे करण्यास मंजुरी देण्यात आली असून ही जमीन पालिकेच्या नावे झाली आहे. किसननगर येथील नागरी पुनरुत्थान आराखडा क्रमांक १२ अतंर्गत येणाऱ्या युआरसी क्रमांक पाच आणि सहा मधील महापालिकेच्या मालकीची १९,३२० चौ.मी आणि २२,३१७ चौ़.मी अशी एकूण ४१,६३७.६० चौ.मी इतकी जमीन आणि त्यासह या जमिनीवर भविष्यात बांधिव स्वरुपात निर्माण होणारी मालमत्ता महाप्रीत कंपनी एचयुडीसीको कडे गहाण ठेवणार आहे, असे पालिकेने प्रस्तावात म्हटले आहे.

Previous Post

आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी यशश्री शिंदे खून प्रकरण…..

Next Post

न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश, ११ आरोपींना ठाकरे गटातील उपशहर प्रमुखाच्या मृत्यूप्रकरणी अटक

Next Post
न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश, ११ आरोपींना ठाकरे गटातील उपशहर प्रमुखाच्या मृत्यूप्रकरणी अटक

न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश, ११ आरोपींना ठाकरे गटातील उपशहर प्रमुखाच्या मृत्यूप्रकरणी अटक

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.