पालघर : विक्रमगड येथील चित्रकार कृष्णा भुसारे व डहाणू गंजाड मधून प्रवीण म्हसे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या आदिवासी चित्रकारांनी काढलेली चित्रे आता कायम स्वरूपी राष्ट्रपती भवनाच्या म्युझियम मध्ये राहणार असल्याचे सांगण्यात आले.
पालघरमधील आदिवासी चित्रशैली ही साता समुद्राभर पोहचली असून अनेक आदिवासी नवोदित चित्रकार आपली कला वेगळ्या देशात तसेच भारतभर पोहचवत आहेत. मुळात आदिवासींची नाळ ही निसर्गाशी अनादीकाळापासून जोडली आहे. त्यामुळे नदी, नाले, झाडे, पशु, जमीन, जल यांच्याशी आदिवासी एकरूप झाले आहेत. निसर्गातील ऋतूमानानुसार होणारे वातावरणातील बदल हे आदिवासी अनुभवत असतो आणि हेच त्यांचे जीवमान आपल्या चित्रशैलीमधून रेखाटन करत असतो. आदिवासी संस्कृती पूर्वी सण, उत्सव, लह्य कार्य यामधून दिसत होती. मात्र बदल्यात काळात हीच आदिम संस्कृती हळूहळू लोप पावत चालली असताना काही आदिवासी यांच्या उपस्थित भारतीय आदिवासी वारली चित्रकला आदिवासी चित्रकारांनी त्यांना समजून सांगितली.
चित्रकार आदिवासी संस्कृतीचे चित्रशैलीद्वारे जतन करण्याचे काम करत आहेत. ह्याच आदिवासी चित्रशैली चे नऊ दिवसाचे शिबिर इंडिया हॅबिटेट सेंटर दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यामधून विक्रमगड येथील चित्रकार कृष्णा भुसारे व डहाणू गंजाड मधून प्रवीण म्हसे यांनी दिल्ली येथे या शिबीरात सहभागी झाले होते. त्यामध्ये विदेश मंत्री डॉ. एस. जयशंकर व पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या उपस्थित भारतीय आदिवासी वारली चित्रकला आदिवासी चित्रकारांनी त्यांना समजून सांगितली. यावेळी राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पूर्ण भारतातून पंधरा आदिवासी कलाकारांना बोलावले होते. कृष्णा भुसारे यांनी आपली वारली चित्रकला आणि राष्ट्रपती भावनावी एकूण (पाच) चित्र तयार केली तसेच प्रवीण म्हसे यांनी (दोन) चित्र तयार केली.