मुंबई : क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे हा सामना बघण्यासाठी अहमदाबाद जाणाऱ्या क्रिकेट प्रेमींची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक आणि पश्चिम रेल्वेने दोन अशा तीन क्रिकेट स्पेशल ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबईतील क्रिटेक प्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना रविवार, १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ अंतिम फेरीत सामना होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी मुंबईसह देशभरातून क्रिकेट प्रेमी अहमदाबादमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबईतून अहमदाबाला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहे. त्यामुळे मुंबईतील क्रिकेट चाहत्यांची गैरसोय लक्षात मध्य आणि पश्चिम रेल्वेने शनिवारी क्रिकेट स्पेशल गाडी चालविण्याची घोषणा केली आहे. शनिवारी रात्री या तीन क्रिकेट स्पेशल ट्रेन सीएसएमटी, मुंबई सेंट्रल आणि बांद्रा टर्मिनस हून अहमदाबादकरिता रवाना होणार आहे.. या स्पेशल गाडयांचे आरक्षण शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे.
पहिली क्रिकेट स्पेशल ट्रेन –
ट्रेन क्रमांक ०११५३ सीएसएमटी -अहमदाबाद स्पेशल एक्सप्रेस शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजता सुटून अहमदाबादला रविवारी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ट्रेन ०११५४ अहमदाबाद-सीएसएमटी विशेष ट्रेन रविवारी रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी सुटून सीएसएमटीला दुसर्या दिवशी सोमवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी येणार आहे. या ट्रेनला सीएसएमटी, दादर, ठाणे, वसई, सुरत, वडोदरा, अहमदाबाद स्थानकात थांबा दिला आहे.
दुसरी क्रिकेट स्पेशल ट्रेन –
ट्रेन क्रमांक ०९००१ वांद्रे टर्मिनस- अहमदाबाद स्पेशल ट्रेन शनिवारी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ट्रेन क्रमांक ०९००२ ट्रेन सोमवारी पहाटे ४ वाजता सुटून दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. या ट्रेनला बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सुरत आणि वडोदरा स्थानकावर थांबा दिला आहे.
तिसरी क्रिकेट स्पेशल ट्रेन –
ट्रेन क्रमांक ०९०४९ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद स्पेशल ट्रेन शनिवारी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८. ४५ वाजता अहमदाबादला पोहोचेल.परतीकरिता ट्रेन क्रमांक ०९०५० ट्रेन सोमवारी सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सुटून दुपारी २ वाजून १० मिनिटांनी मुंबई सेंट्रलला पोहोचेल.या ट्रेनला बोरिवली, वापी, वलसाड, सुरत, भरूच आणि वडोदरा स्थानकात थांबा दिला आहे