Lokrakshanay
Saturday, June 27, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

‘दो दुनिया एक दिल’मधील ग्लॅमरस आणि नकारात्मक छटांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 8, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : गेली चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकत आहेत. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ या लोकप्रिय मराठी मालिकेनंतर त्यांनी ‘बिग बॉस मराठी ५’ या रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. या कार्यक्रमातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समोर आले. त्यानंतर त्यांनी काही काळ कोकणी रंगभूमीवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे त्या पुन्हा मालिकांमध्ये कधी दिसणार, याची उत्सुकता चाहत्यांना होती. आता त्या ‘दो दुनिया एक दिल’ या हिंदी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असून त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’नंतर मी मालिका केल्या नव्हत्या. मात्र चाहत्यांची इच्छा होती की, मी हिंदी मालिकेत काम करावे. मार्च महिन्यात वाहिनीकडून फोन आला आणि भूमिका आवडल्यामुळे मी ती स्वीकारली, असे वर्षा उसगांवकर यांनी सांगितले.

या मालिकेत उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर आधारित एका श्रीमंत कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. त्यामध्ये वर्षा उसगांवकर एका धनाढ्य भावाच्या बहिणीची भूमिका साकारत आहेत. या भूमिकेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, मालिकेतील पात्रांसाठी शुद्ध हिंदी आणि उत्तर प्रदेशातील खास लहेजावर विशेष मेहनत घेतली. खलनायकी छटा असलेली आणि ग्लॅमरस स्वरूपाची ही भूमिका साकारताना समाधान मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. कथानकात आपल्या भावाशी सूड घेणाऱ्या बहिणीची व्यक्तिरेखा त्यांनी साकारली आहे. पुनरागमनासाठी वेगळी आणि प्रभावी भूमिका शोधत असल्यामुळे ही मालिका स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोकणी नाटकांनंतर त्यांनी काही काळ विश्रांती घेतली होती; मात्र या मालिकेमुळे पुनरागमनाला योग्य दिशा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रेक्षकांकडून मालिकेला आणि त्यांच्या भूमिकेला मिळणारा प्रतिसाद पाहून आनंद होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Previous Post

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

Next Post

‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ची राज्यस्तरीय घोषणा; पहिला पुरस्कार अजित पवारांच्या नावाने!

Next Post
‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ची राज्यस्तरीय घोषणा; पहिला पुरस्कार अजित पवारांच्या नावाने!

‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ची राज्यस्तरीय घोषणा; पहिला पुरस्कार अजित पवारांच्या नावाने!

BreakingNews

१ जुलैपासून पासपोर्ट महागणार; १४ वर्षांनंतर शुल्कात मोठी वाढ!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण मोठ्या पडद्यावर; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा!

मलंगगडाचा कायापालट! ३५०० पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी

महिला सुरक्षेसाठी ‘खाकीतील सखी’ उपक्रमाला बळ; ठाणे स्थानकात जनजागृती मोहीम!

खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी ‘सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश’; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतासमोर आज ‘करा किंवा मरा’चा सामना!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.