Lokrakshanay
Tuesday, June 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

जनगणना, SIR सर्वेक्षण आणि प्रशिक्षणाच्या तिहेरी ताणातून शिक्षकांना दिलासा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 8, 2026
in ताज्या बातम्या, नागपूर
जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

नागपूर : राज्यातील शिक्षकांवर एकाच वेळी जनगणना, मतदार यादी पडताळणी (SIR) आणि नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षणाची जबाबदारी आल्याने निर्माण झालेला ताण अखेर कमी झाला आहे. २०२७ च्या जनगणनेसाठी कुटुंब गणनेचे काम १६ मे ते १४ जून या कालावधीत पार पडणार असून राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील बहुतांश शिक्षकांची सेवा या कामासाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. त्याच कालावधीत इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रमासंदर्भातील तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे भर उन्हाळ्यात तिन्ही कामांचा ताण सांभाळणे शिक्षकांसाठी कठीण ठरणार असल्याची नाराजी व्यक्त होत होती. अखेर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी शिक्षक प्रशिक्षणाच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परिषद संचालक डॉ. हेमंत कुमार वसेकर यांनी याबाबत पत्र जारी केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिली. शिक्षक संघटनांनी जनगणनेच्या कालावधीत प्रशिक्षण घेणे शक्य नसल्याचे सांगत प्रशिक्षण पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

दरम्यान, Election Commission of India यांच्या निर्देशानुसार राज्यात मतदार यादी पडताळणीचे कामही सुरू असून अनेक शिक्षकांना BLO म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे जनगणना, SIR सर्वेक्षण आणि प्रशिक्षण अशी तिहेरी जबाबदारी शिक्षकांवर आली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तसेच राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना संचालकांकडे निवेदन देत प्रशिक्षण पुढे ढकलण्याची मागणी केली होती. यासंदर्भात परिषद आणि राज्य जनगणना कार्यालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊन तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम सध्या स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. २९ एप्रिल रोजी मंत्रालयात शालेय शिक्षण राज्यमंत्री Pankaj Bhoyar यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही ही मागणी मांडण्यात आली होती. त्यानंतर राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी शिक्षण विभागाला प्रशिक्षण कार्यक्रमात आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

Previous Post

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Next Post

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

Next Post
कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल - मंत्री डॉ. अशोक वुईके

BreakingNews

‘देऊळ बंद २’चा नफा शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी; प्रवीण तरडेंचा ऐतिहासिक निर्णय!

मुंबईत मराठी नामफलक मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण; १,१२४ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई!

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.