Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

वादग्रस्त गाण्यावरून टीका वाढल्यानंतर अभिनेत्रीचा मोठा निर्णय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 7, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र, मुंबई
‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिने ‘सरके चुनार’ या वादग्रस्त गाण्याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर राहत अधिकृतपणे माफी मागितली आहे. या गाण्यात महिलांचे कथितपणे अश्लील आणि आक्षेपार्ह चित्रण करण्यात आल्याचा आरोप होत होता. त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने अभिनेत्रीला स्पष्टीकरणासाठी समन्स बजावले होते. आयोगातून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना नोराने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत, “एक जबाबदार नागरिक म्हणून मी महिला आयोगाची माफी मागितली आहे. समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून मी ही भूमिका घेतली,” असे सांगितले. तसेच समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याच्या उद्देशाने १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय घेतल्याची घोषणाही तिने केली. या निर्णयामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी तिच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

केडी: द डेव्हिल या चित्रपटातील ‘सरके चुनार’ गाणे प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेचा भडका उडाला होता. महिलांचे सादरीकरण आणि गाण्यातील काही दृश्यांवर आक्षेप घेत अनेक संघटनांनी कारवाईची मागणी केली होती. वाढत्या विरोधानंतर हे गाणे यूट्यूबवरून हटवण्यात आले. दरम्यान, नोराने याआधी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपण फक्त कन्नड आवृत्तीसाठी शूट केले होते आणि हिंदी आवृत्तीत गाण्याचा वापर कसा होईल याची कल्पना नव्हती, असे स्पष्ट केले होते. मात्र, आता तिने संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत माफी मागितली आहे. यापूर्वी संजय दत्त आणि बादशाह यांनीही राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर होत खेद व्यक्त केला होता. संजय दत्त यांनी ५० आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले होते. या संपूर्ण प्रकरणामुळे मनोरंजन क्षेत्रातील आशय, महिलांचे चित्रण आणि सामाजिक जबाबदारी या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

Previous Post

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Next Post
मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.