Lokrakshanay
Friday, September 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मनसेची कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईतील निवासस्थानी बैठक घेऊन त्यात या निवडणुकीबाबत चर्चा केली होती.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 17, 2023
in ठाणे, ताज्या बातम्या
मनसेची कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू असतानाच, त्यापाठोपाठ आता मनसेनेही हि निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे, पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी, मनसे संलग्न संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यात या निवडणूक लढविण्याबाबत चर्चा केल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. या निवडणुकीसाठी किती मतदान नोंदणी करण्यात आली, याचा आढावा घेऊन या निवडणुकीबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्याचे सुत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासूनन सर्वच राजकीय पक्षांनी कोकण पदवीधर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांकडून मतदार नोंदणी करण्यात येत आहे. आता या निवडणुकीच्या मैदानात मनसेही उतरणार आहे. काही दिवसांपुर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईतील निवासस्थानी बैठक घेऊन त्यात या निवडणुकीबाबत चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांनी गुरूवारी ठाण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मनसेच्या नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला मनसे नेते अभिजीत पाचंगे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्यासह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कोकण पदवीधर निवडणूक लढविण्याबाबतचा आढावा घेतला. या निवडणुकीसाठी पक्षाकडून किती मतदार नोंदणी करण्यात आली आहे, याचाही आढावा त्यांनी घेतला. ही निवडणूक कशा पध्दतीने लढविली पाहिजे आणि या निवडणुकीत कशाप्रकारे मतदान करण्यात येते. मतदारांना त्या दृष्टीने कसे जागरुक करावे, याबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ठाण्यात शिंदेची शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी (शरद पवार गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजप या पक्षांकडून पदवीधर निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असतानाच, आता या निवडणुकीच्या रिंगणात मनसेही उतरणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

 

Previous Post

दहशत निर्माण करून नागरिकाला डोंबिवलीत फडके रोडवर लुटणारे दोन जण अटकेत

Next Post

भारतीय रेल्वेने मोठा निर्णय; क्रिकेटप्रेमी प्रवाशांसाठी क्रिकेट वर्ल्ड कप स्पेशल ट्रेन चालवणार

Next Post
भारतीय रेल्वेने मोठा निर्णय; क्रिकेटप्रेमी प्रवाशांसाठी क्रिकेट वर्ल्ड कप स्पेशल ट्रेन चालवणार

भारतीय रेल्वेने मोठा निर्णय; क्रिकेटप्रेमी प्रवाशांसाठी क्रिकेट वर्ल्ड कप स्पेशल ट्रेन चालवणार

BreakingNews

पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचे ढग गडद! अमेरिकेने इराणचे ५ ऑइल टँकर्स केले उद्ध्वस्त; तणाव शिगेला

सूरज चव्हाणच्या घरी ‘राधा’चे आगमन! कृष्ण जन्माष्टमीला कन्यारत्नाचा लाभ; कुटुंबात आनंदोत्सव

सरकारी रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक औषधांचा साठा अनिवार्य; राज्य सरकारची नवी यादी लागू!

डब्यात कांदा-लसूण नको! मिरा रोडमधील शाळेच्या पर्यूषण मेसेजवरून मनसे आक्रमक

शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

उबरचा मोठा निर्णय! ३,३०० कर्मचाऱ्यांची कपात; ‘वर्क फ्रॉम होम’ वर निर्बंध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.