Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांना जातीय भेदभाव रोखण्याबाबत केले सतर्क

विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी देशातील सर्व विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांना जातीय भेदभाव रोखण्याबाबत सतर्क केले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 3, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांना जातीय भेदभाव रोखण्याबाबत केले सतर्क
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी देशातील सर्व विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांना जातीय भेदभाव रोखण्याबाबत सतर्क केले आहे. जातीय भेदभावासंदर्भातील तक्रारींबाबत कार्यवाही करण्यासाठी विद्यापीठाच्या स्तरावर स्वतंत्र समितीची स्थापना करून त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) प्रतिनिधींचा समावेश करण्याची सूचना करण्यात असून, गेल्या शैक्षणिक वर्षात घडलेल्या भेदभावाबाबतच्या प्रकरणांची माहिती मागवण्यात आली आहे. युजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. जातीय भेदभाव रोखण्यासंदर्भात युजीसीने वेळोवेळी उच्च शिक्षण संस्थांना सूचना दिल्या आहेत. आता शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नव्याने सूचना देण्यात आल्या आहेत. एससी, एसटी विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक पार्श्वभूमीमुळे भेदभाव होईल अशी कोणतीही कृती प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी करू नये. विद्यापीठ, संलग्नित महाविद्यालय, उच्च शिक्षण संस्थेने जातीय भेदभावासंदर्भातील तक्रारी नोंदवण्यासाठी त्यांच्या संकेतस्थळावर एक पान तयार करावे. तसेच एक नोंदवही करावी. भेदभावासंदर्भातील प्रकार निदर्शनास आल्यास त्या बाबत तातडीने कार्यवाही करावी. कोणत्याही समाज किंवा जातीच्या विद्यार्थांबाबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही याची काळजी घेतली जावी. जातीय भेदभावाचे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्यात यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये घडलेल्या जातीय भेदभावासंदर्भातील घटनांची माहिती सादर करण्याचे निर्देशही युजीसीने उच्च शिक्षण संस्थांना दिले. त्यात विद्यापीठ स्तरावर समिती नियुक्त केली आहे का, तक्रार नोंदवण्यासाठी संकेतस्थळावर पान तयार केले आहे का, गेल्या वर्षभरात घडलेल्या घटना, तक्रारीमध्ये आत्महत्येसारखा प्रकार घडला आहे का, प्रकरण दाखल झाल्यानंतर केलेली कार्यवाही, दाखल झालेली प्रकरणे आणि सोडवलेली प्रकरणे आदी माहिती मागवण्यात आली आहे. त्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Previous Post

पूर्वमोसमी पावसाची नवी मुंबई, ठाणे परिसरात हजेरी

Next Post

बाल न्याय मंडळाच्या प्रमुख न्यायदंडाधिकाऱ्यांची बदली

Next Post
बाल न्याय मंडळाच्या प्रमुख न्यायदंडाधिकाऱ्यांची बदली

बाल न्याय मंडळाच्या प्रमुख न्यायदंडाधिकाऱ्यांची बदली

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.