Lokrakshanay
Saturday, July 25, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 24, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : अभिनेता-राजकारणी थलपथी विजयचा बहुप्रतिक्षित ‘जन नायकन’ हा चित्रपट २३ जुलै २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित झाला असून, पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. दिग्दर्शक एच. विनोद यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी कमाईच्या बाबतीत चित्रपटाने प्रभावी कामगिरी केली आहे. SACNILCच्या प्राथमिक अंदाजानुसार, चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी ४१ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. देशभरातील १३,०६७ शोमधून चित्रपटाने भारतात सुमारे ४८.२७ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली, तर परदेशातील प्रदर्शनातून ३० कोटी रुपये मिळवत जागतिक स्तरावर एकूण ७८.२७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या कामगिरीमुळे ‘जन नायकन’ची नोंद २०२६ मधील सर्वात मोठ्या तमिळ ओपनिंगपैकी एक म्हणून झाली आहे. विशेष म्हणजे तामिळनाडूमध्ये विजयच्या चाहत्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला उत्सवाचे स्वरूप दिले. अनेक चित्रपटगृहांबाहेर ढोल-ताशे, फटाके, दुग्धाभिषेक आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यामुळे चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईत तामिळनाडूचा मोठा वाटा राहिल्याचे दिसून आले.

चित्रपटाच्या कमाईमध्ये तमिळ आवृत्तीचा सर्वाधिक वाटा राहिला. तमिळ भाषेतील प्रदर्शनातून ३६.५० कोटी रुपये, तर तेलुगू आवृत्तीतून २.७५ कोटी रुपये कमावण्यात आले. सर्व भाषांमधील चित्रपटाची सरासरी प्रेक्षक उपस्थिती ४१.६० टक्के नोंदवण्यात आली. त्यापैकी तमिळ आवृत्तीची एकूण ऑक्युपन्सी ६८.३१ टक्के होती. सकाळच्या शोमध्ये ७३.८५ टक्के, दुपारच्या शोमध्ये ६२.४६ टक्के, संध्याकाळच्या शोमध्ये ६३.६२ टक्के, तर रात्रीच्या शोमध्ये पुन्हा ७३.३१ टक्के प्रेक्षक उपस्थिती नोंदवली गेली. दुसरीकडे, तेलुगू आवृत्तीची ऑक्युपन्सी २७.८१ टक्के, तर हिंदी आवृत्तीची १४.६० टक्के राहिली. या चित्रपटात थलपथी विजयने ‘वेत्री कोंडन’ या निर्भीड माजी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून, आपल्या दत्तक मुलीला सैनिक बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीची कथा यात मांडण्यात आली आहे. चित्रपटात बॉबी देओल यांनी जॉन हिमलर या खलनायकाची भूमिका साकारली आहे. याशिवाय पूजा हेगडे, ममिता बैजू, प्रकाश राज, गौतम वासुदेव मेनन, प्रियामणी आणि नरेन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. थलपथी विजयच्या राजकीय प्रवासामुळे हा त्यांच्या कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट असू शकतो, अशीही चर्चा सुरू आहे. पहिल्याच दिवशी मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर आता पहिल्या वीकेंडमध्ये ‘जन नायकन’ २०० कोटींचा टप्पा गाठतो का, याकडे चित्रपटसृष्टीसह चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

 

Previous Post

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

BreakingNews

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिसचा वाढता धोका; निष्काळजीपणा पडू शकतो महागात!

सहकाराची नवी क्रांती ‘भारत टॅक्सी’मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.