Lokrakshanay
Thursday, April 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

खारघरमध्ये थायलंडचा हायड्रो गांजा विक्री करणा-याला अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 3, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
खारघरमध्ये थायलंडचा हायड्रो गांजा विक्री करणा-याला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

पनवेल : थायलंड येथून तस्करीने आणलेला हायड्रो गांजा खारघरमध्ये बाळगणा-या एका तरूणास नवी मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. या तरूणाच्या दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.  काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईमध्ये परदेशातून हायड्रो गांजाच्या तस्करीच्या एका प्रकरणाने शहर हादरून गेले होते. पुन्हा असेच एक प्रकरण गांजा बाळगणा-या एका तरूणाला पकडल्यानंतर उजेडात आले आहे. अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख संदीप निगडे यांनी गुरुवारी रात्री केलेल्या कारवाईत हे प्रकरण चर्चेत आले.  पोलिसांना खारघर येथील सेक्टर १९ येथील उद्याणासमोरील एका इमारतीमध्ये अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाल्यानंतर २९ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली. या तरूणाजवळच्या मोटारीची झडती घेतल्यावर त्याच्याकडे ८०० मिलीग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा सापडला. तसेच प्लास्टीक पिशव्या, गांजा बारीक करण्यासाठी क्रशर, आणि वजनकाटा पोलिसांना सापडला. पोलिसांनी या तरूणाकडे अधिक चौकशी केल्यावर धक्कादायक बाब समोर आली.

अटकेत असलेल्या तरूणाच्या दोन मित्रांनी त्याला हा गांजा विक्रीसाठी दिला असून या दोन मित्रांनी थायलंड देशातून छुप्या मार्गाने (सीमाशुल्क विभागाला लपवून) त्याची तस्करी केल्याचे समोर आले. पोलीसाचे खास पथक सध्या त्या दोन तरूणांचा शोध उलवे आणि मुंबई येथील उपनगरामध्ये घेत आहेत. थायलंड आणि अमेरीका या देशांमध्ये हायड्रो गांजावर निर्बंध नाहीत. त्यामुळे पोस्ट आणि सीमाशुल्क विभागाच्या माध्यमातून तो भारतात कुरीयर मार्फत पाठविला जातो. जून महिन्यात नवी मुंबई पोलिसांनी हायड्रो गांजाच्या अशाच एका तस्करी आणि विक्री प्रकरणी सलग २० जणांवर कारवाई केली. या प्रकरणी पोस्ट आणि सीमाशुल्क विभागाच्या उच्च अधिका-यांवर गुन्हे नोंद केले. तसेच नवी मुंबईच्या दोन पोलिसांचा सहभाग या तस्करीत आढळल्याने त्यांना सुद्धा बडतर्फ केले होते. या तस्करीमध्ये उच्चशिक्षित तरूणांच्या सहभागामुळे पालकांसह पोलिसांची झोप उडाली आहे.

Previous Post

दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण प्रभावी करण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण आयुक्तां’ची कार्यपद्धती निश्चित – सचिव तुकाराम मुंढे

Next Post

“राज ठाकरे के छाती पर चढूँगा..”, सुरक्षा रक्षकाला मनसे सैनिकांचा दणका!

Next Post
“राज ठाकरे के छाती पर चढूँगा..”, सुरक्षा रक्षकाला मनसे सैनिकांचा दणका!

“राज ठाकरे के छाती पर चढूँगा..”, सुरक्षा रक्षकाला मनसे सैनिकांचा दणका!

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.