Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळण्याच्या चौकशीसाठी टेक समिती स्थापन

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकना शिंदे यांनी घेतला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 29, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळण्याच्या चौकशीसाठी टेक समिती स्थापन
Share on FacebookShare on Whatsapp

महाराष्ट्र : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकना शिंदे यांनी घेतला आहे. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा असा भव्य आणि अत्युत्कृष्ट दर्जाचा पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक वेगळी समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. याचबरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने व भव्य स्वरुपात पुतळा तयार करणे आणि उभारणे यासाठी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी बॉम्बे, स्थापत्य अभियंते, महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी याची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यानी दिले आहेत

या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा (मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान) येथे संबंधितांची बैठक बोलावली होती. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव (नगरविकास खाते) असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ॲडमिरल अजय कोचर, रियर ॲडमिरल मनीष चड्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता. भविष्यात अशी दुर्घटना परत कधीच घडू नये याची आपण खूप काळजी घेतली पाहिजे. नव्याने उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही

Previous Post

भाजपचे कृत्य, अधम आणि नीच प्रकारचं, म्हणून आम्ही जोडे मारो आंदोलन करणार – संजय राऊत

Next Post

राजे आम्हाला माफ करा..! अजित पवार गटाची स्पष्ट भूमिका आणि मूक आंदोलन

Next Post
राजे आम्हाला माफ करा..! अजित पवार गटाची स्पष्ट भूमिका आणि मूक आंदोलन

राजे आम्हाला माफ करा..! अजित पवार गटाची स्पष्ट भूमिका आणि मूक आंदोलन

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.