Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

दुचाकी स्वारांवर कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ दगडफेक

रामोत्सवानिमित्त २० जणांनी दुचाकींवरून काढलेली फेरी दुर्गाडी किल्ल्याजवळील गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्याजवळच्या पुलावर गेल्यावर अज्ञात इसमांनी दगड दुचाकी स्वारांच्या दिशेने भिरकावले.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 23, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून रेल्वे प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्यांना अटक
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : रामोत्सवाचा आनंद साजरा करत कल्याण मधील २० जणांनी शहरात दुचाकींवरून फेरी काढली होती. ही फेरी दुर्गाडी किल्ल्या जवळील गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्या जवळील पुलावर गेल्यावर तेथे अज्ञात इसमांनी दोन दगड दुचाकी स्वारांच्या दिशेने भिरकावले. यामध्ये एका दुचाकीचे नुकसान झाले आहे, अशी तक्रार एका दुचाकी स्वाराने बाजारपेठ पोलीस ठाण्यात केली आहे. गोविंदवाडी पुलाखाली एक अज्ञात जमाव होता. त्यामधील एका इसमाच्या हातात धारदार शस्त्र होते. हा इसम संतप्त झाला होता. त्याला इतर जमाव रोखून धरत होता, असेही बाजारपेठ पोलीस ठाण्यात दयाप्रभू शेंडकर (२४), बबलू यादव यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार दयाप्रभू शेंडकर, त्याचा मित्र भावेश शिंदे, बबलू यादव हे २० दुचाकींच्या समुहाने दुर्गाडी किल्ल्या जवळील गोविंदवाडी बाह्यवळण पुलाजवळून जात होते. त्यावेळी पुलाखालून अज्ञात इसमांनी जोराने दोन दगड फिरकावले. एक दगड तक्रारदाराच्या दुचाकीच्या पुढे, एक दगड दुचाकीच्या पाठीमागील बाजुला पडला. पाठीमागील दगडाने दुचाकीची वाहन क्रमांकाची पट्टी तुटली आहे. दुचाकीवरील तक्रारदार आणि त्याचा मित्र सुदैवाने दगडफेकीतून बचावले. बबलू यादव याने पुलाखाली पाहिले तर एक जमाव तेथे जमला होता. त्यामधील एकाकडे धारदार शस्त्र होते. तो इसम संतप्त झाला होता. त्याला इतर लोक रोखून धरत होते. ४० वर्षाचा हा इसम होता. असे तक्रारीत म्हटले आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Previous Post

पुणे महापालिकेचे खाऊ गल्लीसाठी नवे धोरण

Next Post

मराठा संघटनांची नवी मुंबईत जरांगे पाटील यांच्या दिंडी मोर्चासाठी जय्यत तयारी

Next Post
मराठा संघटनांची नवी मुंबईत जरांगे पाटील यांच्या दिंडी मोर्चासाठी जय्यत तयारी

मराठा संघटनांची नवी मुंबईत जरांगे पाटील यांच्या दिंडी मोर्चासाठी जय्यत तयारी

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.