Lokrakshanay
Tuesday, June 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मराठा संघटनांची नवी मुंबईत जरांगे पाटील यांच्या दिंडी मोर्चासाठी जय्यत तयारी

मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे यांनी काढलेल्या दिंडी मोर्चाचा २५ तारखेला शेवटचा मुक्काम नवी मुंबईत असणार आहे. यासाठी नवी मुंबई समन्वयकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 24, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
मराठा संघटनांची नवी मुंबईत जरांगे पाटील यांच्या दिंडी मोर्चासाठी जय्यत तयारी
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे यांनी काढलेला दिंडी मोर्चा मुंबईत २६ जानेवारीला धडकणार असून २५ तारखेला मुंबई पूर्वी शेवटचा मुक्काम नवी मुंबईत असणार आहे. यासाठी नवी मुंबई समन्वयकांनी जोरदार तयारी सुरु केली असून किमान दोन ते अडीच कोटी लोकांचा जनसागर येईल अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली २० जानेवारी पासून सुरु झालेल्या पायी मराठा आरक्षण मागणीसाठी काढण्यात आलेल्या दिंडीचा मुक्काम २५ तारखेला नवी मुंबई शहरात होणार आहे. यासाठी नियोजनच्या तयारीसाठी मराठा क्रांती मोर्चा, नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालय बनवण्यात आले आहे. २५ जानेवारीला नवी मुंबई करोडोच्या संख्येने मराठा समाज नवी मुंबईत दाखल होणार आहे. त्यांच्या राहण्याची, खाण्याची तसेच पाण्याची, शौचालय व्यवस्थेबाबत नवी मुंबई मनपा आणि सिडकोला विनंती करण्यात आली आहे. या दिवशी कांदा बटाटा मार्केट बंद असणार आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतर बाजार बाबत मार्केट मधील मुक्कामाबाबत माथाडी कामगार संघटना, व्यापारी, मार्केट प्रशासनासोबत नवी मुंबई मराठा क्रांती मोर्चा शिष्टमंडळाने बैठक तसेच पत्रव्यवहार केला आहे. तसेच महिलांच्या साठी सिडको प्रदर्शनी केंद्रात सोय करावी अशी मागणी सिडको कडे करण्यात आली आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. सिडको आणि नवी मुंबई मनपाने अद्याप सकरात्मक प्रतिसाद दिलेला नाही. आमचे प्रयत्न सुरु आहेत. कदाचित सरकारच्या दबावामुळे सहकार्य होत नसावे. याचा अर्थ सरकारला अद्याप मोर्चाचे गांभीर्य कळले नाही असा आरोप यावेळी करण्यात आला. सदर पत्रकार परिषदेत समन्वयक विनोद पोखरकर, कदम सूरत बर्गे, बाळासाहेब जगताप, बन्सी डोके, साधना ढवळे आदी उपस्थित होते.

Previous Post

दुचाकी स्वारांवर कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ दगडफेक

Next Post

मुंबई, डोंबिवलीत जैन मंदिरात चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्याला छापा टाकून केली अटक

Next Post
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक

मुंबई, डोंबिवलीत जैन मंदिरात चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्याला छापा टाकून केली अटक

BreakingNews

‘देऊळ बंद २’चा नफा शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी; प्रवीण तरडेंचा ऐतिहासिक निर्णय!

मुंबईत मराठी नामफलक मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण; १,१२४ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई!

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.