Lokrakshanay
Monday, May 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुणे महापालिकेचे खाऊ गल्लीसाठी नवे धोरण

यासाठी उपसमिती पाहणी अहवाल सादर करणार आहे. धोरणात काय असावे, याच्या शिफारशी यामध्ये केल्या जाणार आहेत. त्यानंतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना एकाच ठिकाणी आणून व्यवसायासाठी जागा देण्यात येणार आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 23, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
पुणे महापालिकेचे खाऊ गल्लीसाठी नवे धोरण
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागांतील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी स्ट्रीड फूड झोन (खाऊ गल्ली) करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या स्तरावर एक उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून खाऊ गल्लीच्या प्रस्तावित ठिकाणांची पाहणी करून धोरणाची शिफारस केली जाणार आहे. शहराच्या विविध भागांतील प्रमुख रस्ते, उपरस्ते, चौकात विविध खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या लावण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची वस्तुस्थिती आहे. यातील बहुतांश खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या बेकायदा आहेत. महापालिकेच्या फेरीवाला धोरणानुसार रस्त्यावर अन्नपदार्थ शिजविण्यास मनाई असून तयार अन्नपदार्थ विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सिलिंडर, स्टोव्ह आणि गॅसचा वापर करून रस्त्यावर अन्नपदार्थ शिजविले जातात. खाद्यपदार्थ विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या खाऊगल्लींच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असतो. तसेच सार्वजनिक स्वच्छतेचा मुद्दाही पुढे येत आहे. त्यामुळे स्ट्रीट फूड झोन तयार करण्यासाठी धोरण निश्चित करण्याचा निर्णय फेरीवाला समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार धोरण निश्चित करण्यासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये गजानन पवार, मंदार धुमाळ, कमल जगधने यांची एक उपसमिती तयार करण्यात आली आहे.

ही समिती पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. धोरणात काय असावे याच्या शिफारशी यामध्ये केल्या जाणार आहेत. संबंधित भागातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना एकाच ठिकाणी आणून व्यवसायासाठी जागा दिली जाईल. तेथे पाणी, वीज आदी सुविधा विक्रेत्यांकरिता उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण दूर होण्यास मदत होईल. तसेच या ठिकाणी सिलिंडरचा वापर करण्यास परवानगी दिली जाण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, धोरण निश्चित करताना उच्च, मध्यम, साधारण आणि सर्वसाधारण अशा चार श्रेणीत निश्चित करावे. त्यासाठी जागा निश्चित करताना उद्यान, बाजारपेठ, एसटी किंवा इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या स्थानकाजवळ असावी, अशी मागणीही फेरीवाला संघटनांकडून करण्यात आली आहे.

Previous Post

नाशिकमध्ये ४१ क्रेडिट कार्ड धारकांची ३४ लाख रुपयांची फसवणूक

Next Post

दुचाकी स्वारांवर कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ दगडफेक

Next Post
कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून रेल्वे प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्यांना अटक

दुचाकी स्वारांवर कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ दगडफेक

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.