Lokrakshanay
Wednesday, April 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पोटच्या मुलीला बुडवण्याच्या धर्मराव आत्राम यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी निशाणा साधला

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची लेक भाग्यश्री आत्राम राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. अहेरी विधानसभा मतदारसंघातून धर्माराव आत्राम यांच्या विरोधात भाग्यश्री यांना शरद पवार तिकीट देण्याची शक्यता आहे. शरद पवार गटातील काही लोक माझं घर फोडायचा काम सुरू आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 7, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
पोटच्या मुलीला बुडवण्याच्या धर्मराव आत्राम यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी निशाणा साधला
Share on FacebookShare on Whatsapp

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची लेक भाग्यश्री आत्राम राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. अहेरी विधानसभा मतदारसंघातून धर्माराव आत्राम यांच्या विरोधात भाग्यश्री यांना शरद पवार तिकीट देण्याची शक्यता आहे. शरद पवार गटातील काही लोक माझं घर फोडायचा काम सुरू आहे. जी मुलगी माझी होऊ शकली नाही ती इतरांनाही काय होणार? यांना आपण प्राणहिता नदीत वाहून देऊ, असं म्हणत आत्राम यांनी त्यांच्याच लेकीवर टीकास्त्र डागलं. त्यावर आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांनी भाष्य केलं आहे. अष्टविनायकपैकी एक असणाऱ्या सिद्धटेक गणपतीचं रोहित यांनी दर्शन घेतलं. यावेळी रोहित पवारांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. जो व्यक्ती आपल्या पोटच्या मुलीबाबत पाण्यात बुडवण्याची भाषा करतो. त्यावरून त्यांची विचारधारा काय आहे, हे समोर येत आहे. भाग्यश्री आत्राम यांनीच शरद पवार साहेबांसोबत येण्यासाठी पुढाकार घेतल्याचं समजत आहे. मात्र सर्वस्वी निर्णय हा शरद पवार यांचा आहे. आम्ही कुणाचंही घर फोडलेल नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज अष्टविनायकापैकी एक असलेल्या सिद्धटेक गणेश मंदिरात पूजा करून स्वाभिमान जनसंवाद यात्रेला सुरुवात केली. या स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन ग्रामदैवत मंदिरात स्वच्छता केली जाणार आहे. तसंच संतांचे विचार हे तिथल्या नागरिकांच्या मनात रुजवले जाणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिले आहे. राज्यामध्ये सध्या महापुरुषांचा अवमान केला जातोय, या गोष्टीचा विरोध करण्यासाठी यात्रा काढली असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील वेगवेगळे एजन्सीच्या माध्यमातून माझ्यावर कारवाई होऊ शकते. मात्र आम्ही ज्या कंपन्या उभ्या केल्या. या कष्टाने आणि तिथे काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीतून उभा केल्या आहेत. मात्र राजकीय दृष्टिकोन ठेवून कोणी काही कारवाई केली. तर इतरांनी देखील आपण काचेच्या घरात राहतो हे विसरू नये. त्यांनी ज्या कंपन्या उभा केलेला आहेत, त्याबाबत मी आता बोलणार नाही. मात्र त्याचं पुस्तक माझ्याकडे तयार आहे, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

Previous Post

मुंबई व्यवस्थापकाचे आवाहन: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या योजनांसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा

Next Post

गणेश चतुर्थीचा क्रेझ: बाजारपेठा खचाखच भरल्या, कार्यकर्ते सक्रिय! चैतन्योत्सव संपूर्ण शहरात चमकला!

Next Post

गणेश चतुर्थीचा क्रेझ: बाजारपेठा खचाखच भरल्या, कार्यकर्ते सक्रिय! चैतन्योत्सव संपूर्ण शहरात चमकला!

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.