मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोरेगाव येथील विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजने मुस्लिम विद्यार्थिनींसाठी ड्रेस कोडवरून नवे निर्देश दिले आहेत. क्लासरूममध्ये बुर्का परिधान करण्यावर बंदी घातली आहे. धक्कादायक म्हणजे ड्रेस कोड मान्य नसेल तर अॅडमिशन रद्द करा, असा इशारा कॉलेज प्रशासनाने दिला आहे. विवेक कॉलेजच्या या निर्णयामुळे मुस्लिम विद्यार्थिनींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुंबईत गोरेगाव येथील विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजाने वर्गात बुर्का घालण्यास मनाई करणारा नवा नियम लागू केला आहे. धक्कादायक म्हणजे ड्रेस कोड मान्य नसेल तर अॅडमिशन रद्द करा, असा इशारा कॉलेज प्रशासनाने दिला आहे. यावरून मुस्लिम विद्यार्थिनींमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. धार्मिक पोशाखावर निर्बंध आणल्याचा आरोप होत असल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.
कॉलेजचा निर्णय त्यांच्या धर्मस्वातंत्र्यात हस्तक्षेप करणारा आहे, असा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे, तर कॉलेज प्रशासनाने यामागे ‘सांस्कृतिक एकरूपता’ असल्याचे म्हटलं आहे. या प्रकरणी सध्या पोलिस आणि कॉलेज प्रशासन यांच्यात चर्चा सुरू आहे. प्राचार्यांनी व्यवस्थापनाशी बोलून लवकरच मार्ग शोधण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या काही वर्षांत देशातील काही शैक्षणिक संस्थांकडून मुस्लिम विद्यार्थिनींच्या पोशाखावर निर्बंध आणल्याचे प्रकार समोर आले आहेत. कर्नाटकमध्ये सन २०२२ मध्ये हिजाब-बुर्का वादाने मोठे रूप घेतलं होते. महाराष्ट्रातही काही कॉलेजांनी यापूर्वी बुर्क्यावर बंदी घातली होती, मात्र हिजाब परवानगीयोग्य ठेवला होता. आता पुन्हा एकदा हा वाद उफाळला आहे. विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये अलीकडेच ड्रेस कोडमध्ये बदल करण्यात आला. नवीन नियमानुसार, वर्गात बुर्का व नकाब घालण्यास बंदी, हिजाब आणि हेडस्कार्फ परवानगी आहे. यापूर्वी अनेक विद्यार्थिनी बुर्का घालूनच वर्गात उपस्थित राहत असत. मात्र नव्या नियमामुळे त्यांना कॉलेज गेटवरच थांबवले जात असल्याचे समोर आले आहे.

