Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी; ठाणे, नवी मुंबई, कल्याण मध्ये घरफोडी करुन धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 27, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी; ठाणे, नवी मुंबई, कल्याण मध्ये घरफोडी करुन धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे, पुणे, नवी मुंबई, कल्याण आणि भिवंडी शहरात घरफोडी करुन धुमाकूळ घालणाऱ्या शिकलकर टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. त्यांच्या अटकेमुळे ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील ४० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून महागड्या मोटारीसह ३९ लाख ५३ हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.

विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर (२४), सोनुसिंग जितेंद्रसिंग जुन्नी (२७), सन्नी करतासिंग सरदार (२७) आणि अतुल खंंडाळे (२४) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात बंद घरामध्ये प्रवेश करुन दागिने, रोकड चोरी झाल्याचे प्रकार मोठ्याप्रमाणात उघडकीस आले होते. कल्याणमधील एका प्रकरणाचा संमातर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण युनीटकडून सुरु होता. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या विजयसिंग, सोनुसिंग, सन्नी आणि अतुल या चौघांना ताब्या घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. यातील विजयसिंग, सोनुसिंग आणि अतुल हे पुण्यातील हडपसर भागातील रहिवासी आहेत. तर सन्नी हा कल्याण येथील आंबिवली भागातील रहिवासी आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ४० गुन्ह्यांची उकल केली आहे. यामध्ये ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील डोबिवली, विष्णुनगर, नारपोली, मुंब्रा, कळवा, मानपाडा, कोळसेवाडी, मध्यवर्ती, शिवाजीनगर, बदलापूर, महात्मा फुले, विठ्ठलवाडी या पोलीस ठाणे हद्दीतील तसेच नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रातील खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे उघडकीस आणणे शक्य झाले. यातील विजयसिंग, सोनुसिंग आणि अतुल या तिघांविरोधात यापूर्वी देखील पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात एकूण २८ गुन्हे दाखल आहेत. सर्वाधिक २० गुन्हे हे एकट्या विजयसिंग याच्याविरोधात आहेत.

Previous Post

गुंतवणुकीच्या आमिषाने विधवा महिलेची कोटींची फसवणूक

Next Post

ठाणे पोलिसांची आता WHATSAPP आधारित सेवा, १ क्लिक वर सेवा उपलब्ध

Next Post
ठाणे पोलिसांची आता WHATSAPP आधारित सेवा, १ क्लिक वर सेवा उपलब्ध

ठाणे पोलिसांची आता WHATSAPP आधारित सेवा, १ क्लिक वर सेवा उपलब्ध

BreakingNews

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.