Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आता विद्यार्थ्यांवर करडी नजर; CBSE च्या धरतीवर राज्य बोर्डाच्या परीक्षेत मोठा बदल

विद्यार्थी सुरक्षा आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 1, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
आता विद्यार्थ्यांवर करडी नजर; CBSE च्या धरतीवर राज्य बोर्डाच्या परीक्षेत मोठा बदल
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : आता इयत्ता 10 आणि 12 वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठे पाऊल टाकलं आहे. CBSE परीक्षेच्या धरतीवर राज्यात आता परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या या धोरणामुळे परीक्षा केंद्रावरील सर्वच गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवाळीनंतर 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा केंद्राच्या झाडाझडतीला ही सुरुवात होणार आहे. विद्यार्थी सुरक्षा आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत अनेक वेळा सीसीटीव्ही बसवा आणि त्याचे स्टोरेज करण्याची चांगली क्षमता असावी अशा सूचना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना वारंवार देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर आता सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. त्यामुळे कॉपी करणारे विद्यार्थी, त्यांना मदत करणारे नातेवाईक आणि काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्हीचा जालीम उपाय करण्यात आला आहे.

मात्र, आजही अनेक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आले नाही. त्यामुळे ही परिस्थिती पाहता आता सीबीएसई बोर्डाच्या धरतीवर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नसतील, त्यांचे परीक्षा केंद्रच रद्द होणार आहे. परीक्षा केंद्र कायम ठेवायचे असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसोबतच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवाळीनंतर परीक्षा केंद्राच्या झाडाझडतीला सुरुवात होणार आहे.

राज्यातइयत्ता 10 आणि 12 वीची अनेक पासिंग सेंटर उदयाला आली आहेत. ग्रामीण भागात ही परीक्षा केंद्र फुलली आहेत. या अडवळणाच्या केंद्रावर राज्यातील अनेक विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खास येतात. साधी रिक्षा सुद्धा न येणाऱ्या या गावांमध्ये परीक्षेच्या काळात लाखोच्या कार उभ्या असतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांना पासिंगसाठी खास व्यवस्था करण्यात आलेली असते. आता अशा परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची खरंच निगराणी असेल का? या तिसऱ्या डोळ्यामुळे अशा पासिंग सेंटरच्या गोरखधंद्याला आळा बसेल का? असा प्रश्न पालक आणि विद्यार्थी वर्गातून विचारण्यात येत आहे.

Previous Post

पुण्यात सीबीआयने फ्रॉड कॉल सेंटरवर छापे टाकत १० जणांना केली अटक !

Next Post

अभिनेता गोविंदाच्या गुडघ्याला लागली गोळी

Next Post
अभिनेता गोविंदाच्या गुडघ्याला लागली गोळी

अभिनेता गोविंदाच्या गुडघ्याला लागली गोळी

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.