अभिनेता गोविंदा : अभिनेता गोविंदाच्या गुडघ्याला गोळी लागली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना सकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली आहे. गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता. दरम्यान, अभिनेता आपले परवाना असलेलं रिव्हॉल्व्हर ठेवत होता, त्यावेळी त्याच्या हातातून रिव्हॉल्व्हर निसटली आणि एक गोळी त्याच्या पायाला लागली. गोळी लागल्यानंतर अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी अभिनेत्याच्या पायातील गोळी काढली असून, गोविंदाची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सांगायचं झालं तर, गोविंदा याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गोविंदा हा इंडस्ट्रीतील एकमेव स्टार नाही ज्याच्याकडे स्वतःच्या संरक्षणासाठी हत्यार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इतर सेलिब्रिटी देखील त्यांच्या संरक्षणासाठी शस्त्रे ठेवतात.