Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आता ठरावीक वजनाच्या पॅकिंगमध्येच मिळणार खाद्यतेल! – केंद्र सरकार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 8, 2026
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
आता ठरावीक वजनाच्या पॅकिंगमध्येच मिळणार खाद्यतेल! – केंद्र सरकार
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : खाद्यतेल खरेदी करताना ग्राहकांची होणारी दिशाभूल टाळण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार खाद्यतेलाची विक्री आता केवळ ठरावीक वजन आणि क्षमतेच्या पॅकमध्येच करता येणार आहे. केंद्रीय ग्राहक कामकाज विभागाने यासंदर्भातील नियमावली लागू केली असून, खाद्यतेल उत्पादक कंपन्यांना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. सध्या बाजारात विविध कंपन्यांकडून वेगवेगळ्या आकार आणि वजनाच्या पॅकमध्ये खाद्यतेल विकले जात असल्याने ग्राहकांना दरांची अचूक तुलना करणे कठीण जात होते. अनेक पॅक आकाराने सारखे दिसत असले तरी त्यामधील तेलाचे प्रमाण वेगळे असल्याने ग्राहकांची दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खाद्यतेल उद्योगातील प्रमुख संघटनांशी चर्चा करून प्रमाणित पॅक आकार निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील खाद्यतेल उद्योग क्षेत्राचे सुमारे ९० टक्के प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांच्या सल्ल्यानंतर ही नियमावली तयार करण्यात आली आहे.

नव्या नियमांनुसार खाद्यतेलासाठी २०० मिली, ५०० मिली, १ लिटर, २ लिटर, ३ लिटर, ४ लिटर, ५ लिटर, १५ लिटर आणि २० लिटर अशी एकूण नऊ प्रमाणित परिमाणे निश्चित करण्यात आली आहेत. या नियमांचा लाभ प्रमुख खाद्यतेले तसेच संमिश्र तेलांनाही लागू होणार आहे. प्रमाणित पॅकमुळे ग्राहकांना विविध कंपन्यांच्या उत्पादनांच्या किमतींची सहज तुलना करता येणार असून खरेदीचा अधिक योग्य आणि पारदर्शक निर्णय घेणे शक्य होईल. २०० मिली अथवा २०० ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या पॅकना या नियमावलीतून वगळण्यात आले आहे, जेणेकरून कमी उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी परवडणाऱ्या दरातील छोटे पॅक उपलब्ध राहतील. ग्राहक संघटना आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांच्या मते, काही कंपन्या १ लिटरऐवजी ९०० मिली किंवा तत्सम कमी प्रमाणातील पॅक बाजारात आणून ग्राहकांची दिशाभूल करत होत्या. नव्या नियमांमुळे अशा प्रकारांना आळा बसणार असून ग्राहकांना अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने खाद्यतेल खरेदी करता येणार आहे.

नवीन नियमावली :

  • खाद्यतेल व संमिश्र तेलांसाठी ठरावीक वजनाचे पॅक
  • पॅकवर वजन आणि आकारमान बंधनकारक
  • देशांतर्गत उत्पादितसोबत आयात खाद्यतेलांसाठीही नियम लागू
  • उत्पादकांना अंमलबजावणीसाठी तीन महिन्यांचा कालावधी
  • दोन उत्पादनांच्या किमतीतील तुलना ग्राहकांसाठी अधिक सोपी
Previous Post

मुंबई मेट्रो १ ला १२ वर्षे पूर्ण; १२५ कोटी प्रवाशांचा टप्पा पार!

Next Post

इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीला नवे बळ!

Next Post
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीला नवे बळ!

इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीला नवे बळ!

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.