Lokrakshanay
Monday, June 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीला नवे बळ!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 8, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीला नवे बळ!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची घोषणा मुंबईतील इस्रायलच्या वाणिज्य दूतावासाने ‘शिवराज्याभिषेक दिना’च्या निमित्ताने केली आहे. ६ जून १६७४ रोजी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. मुंबईतील इस्रायलचे कॉन्सुल जनरल यानीव रेवाच यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान वारशाला साजेसे स्मारक उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे सहकार्य मागण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात रेवाच यांनी नमूद केले आहे की, इस्रायलमध्ये उभारण्यात येणारा शिवाजी महाराजांचा पुतळा हा भारत आणि इस्रायल यांच्यातील दृढ मैत्रीचे प्रतीक ठरेल. महाराष्ट्र आणि भारतीय ज्यू समाज यांच्यातील ऐतिहासिक संबंध लक्षात घेता या स्मारकाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. भारतीय ज्यू समाजातील अनेकांचे वंशज आज इस्रायलच्या सामाजिक आणि राष्ट्रीय विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. स्मारकाच्या उभारणीसाठी ऐतिहासिक संदर्भ, कलात्मक मार्गदर्शन, रचना आणि अन्य तांत्रिक बाबींमध्ये महाराष्ट्र सरकारचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यानीव रेवाच यांनी सांगितले की, पुढील टप्प्यात हा प्रकल्प लोकसहभागातून राबविण्याचा विचार असून त्यामुळे दोन्ही देशांतील जनतेमधील मैत्री आणखी दृढ होईल. धैर्य, नेतृत्व, सुशासन आणि परस्पर आदर या महाराष्ट्र आणि इस्रायलच्या सामायिक मूल्यांना ही एक कायमस्वरूपी मानवंदना ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक इस्रायल दौऱ्यानंतर दोन्ही देशांतील लोकांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून हा प्रकल्प साकारला जात आहे. रेवाच यांनी सांगितले की, मुंबईत आल्यानंतर त्यांनी मराठा साम्राज्याचा इतिहास अभ्यासला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याने ते प्रभावित झाले. शिवाजी महाराज हे केवळ मराठा साम्राज्याचे संस्थापक नव्हते, तर ते दूरदृष्टी असलेले शासक, कुशल सेनानी आणि लोककल्याणकारी नेतृत्वाचे प्रतीक होते. सुशासन, धार्मिक सहिष्णुता, सागरी सामर्थ्य आणि प्रजेच्या सुरक्षेबाबतची त्यांची धोरणे आजही प्रेरणादायी आहेत. भारतात सर्वत्र शिवाजी महाराजांबद्दल असलेला आदर पाहून इस्रायलमध्येही त्यांच्या कार्याची अधिक व्यापक ओळख व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

आता ठरावीक वजनाच्या पॅकिंगमध्येच मिळणार खाद्यतेल! – केंद्र सरकार

Next Post

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत! – बच्चू कडूंचे विधान

Next Post
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत! – बच्चू कडूंचे विधान

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत! - बच्चू कडूंचे विधान

BreakingNews

इराण-इस्रायल संघर्ष पुन्हा भडकला; भारतीयांना इराण सोडण्याचा सल्ला

पुणेकरांनो, सावधान! महापालिका पुढील ३ महिने करणार ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा?

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत! – बच्चू कडूंचे विधान

इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीला नवे बळ!

आता ठरावीक वजनाच्या पॅकिंगमध्येच मिळणार खाद्यतेल! – केंद्र सरकार

मुंबई मेट्रो १ ला १२ वर्षे पूर्ण; १२५ कोटी प्रवाशांचा टप्पा पार!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.