Lokrakshanay
Tuesday, September 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

गोदरेज ब्लॉकचा देशव्यापी शुभारंभ; महाराष्ट्रातील ५०० महिलांना पिंक ई-रिक्षा देणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 23, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
गोदरेज ब्लॉकचा देशव्यापी शुभारंभ; महाराष्ट्रातील ५०० महिलांना पिंक ई-रिक्षा देणार
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने आपल्या नवीन ‘गोदरेज ब्लॉक’ या अंडरआर्म डिओडरंट आणि अँटीपर्स्पिरंट ब्रँडचा देशभरात शुभारंभ केला. या निमित्ताने कंपनीने भामला फाऊंडेशनसोबत भागीदारी करत महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील ५०० महिलांना पिंक ई-रिक्षांचे वितरण करण्यात येणार असून, महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला चालना देणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या पिंक ई-रिक्षा योजनेला पाठबळ देत भामला फाऊंडेशन लाभार्थी महिलांना आर्थिक सहभागाचा भार उचलण्यास मदत करणार आहे. तसेच वाहनासाठी आवश्यक वित्तपुरवठा, प्रशिक्षण, नोंदणी आणि योजनेत सहभागी होण्यासाठी लागणारे मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाणार आहे. या उपक्रमात गोदरेज ब्लॉकनेही सहभाग नोंदवत ५०० पिंक ई-रिक्षांचे वितरण करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय या योजनेतील महिला ई-रिक्षा चालकांना ‘ब्लॉक फ्रेशनेस किट’ देण्यात येणार असून, त्याद्वारे कंपनीच्या नव्या पर्सनल केअर उत्पादनांचा लाभही त्यांना मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी दिवसभर ताजेतवाने आणि आत्मविश्वासपूर्ण राहण्यासाठी ही उत्पादने उपयुक्त ठरतील, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

नव्या ब्रँडच्या शुभारंभप्रसंगी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे पर्सनल केअर मार्केटिंग प्रमुख समीर सूर्यवंशी यांनी सांगितले की, बदलत्या आणि वेगवान जीवनशैलीनुसार ग्राहकांना सोयीस्कर, प्रभावी आणि दर्जेदार उत्पादनांची आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेऊन ‘गोदरेज ब्लॉक’ विकसित करण्यात आले असून, आधुनिक लोशन स्वरूपातील हे उत्पादन घाम आणि दुर्गंधीपासून प्रभावी संरक्षण देते. कंपनीने अँटीपर्स्पिरंट श्रेणीत सादर केलेले हे उत्पादन ४८ तासांपर्यंत घाम आणि शरीराच्या दुर्गंधीपासून संरक्षण देत असल्याचा दावा केला आहे. तसेच अंडरआर्मच्या त्वचेची योग्य निगा राखण्यास मदत करणारे हे उत्पादन सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले. ४० ग्रॅमच्या आकर्षक पॅकमध्ये उपलब्ध असलेल्या या उत्पादनाची किंमत ९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना हे उत्पादन ब्लिंकिट, झेप्टो, बिगबास्केट, अमेझॉन तसेच इतर प्रमुख क्विक-कॉमर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध होणार आहे. नव्या उत्पादनाच्या लाँचसोबत सामाजिक उत्तरदायित्व जपत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना देण्याचा प्रयत्न कंपनीने या उपक्रमातून केला आहे.

 

 

Previous Post

मिरारोडमध्ये पंचरच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १०० टक्के मुद्देमाल जप्त!

Next Post

सहकाराची नवी क्रांती ‘भारत टॅक्सी’मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
सहकाराची नवी क्रांती ‘भारत टॅक्सी’मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहकाराची नवी क्रांती ‘भारत टॅक्सी’मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

BreakingNews

BEST बसमध्ये दिव्यांगांचा प्रवास आता १००% मोफत; महापालिकेकडून ७.६४ कोटींच्या अनुदानाला मंजुरी

“…तेव्हाच हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईल”; इराणची अमेरिकेला थेट इशारा

आंतरराज्यीय आयफोन चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त; मुंबई पोलिसांकडून ४ आरोपींना अटक!

राजधानी दिल्ली हादरली! पाच मजली इमारत विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवर कोसळली; ५० हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली?

Instagram वरही मुंढेंची क्रेझ; फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंना टाकले मागे!

‘बिग बॉस २०’ चा धमाका; ‘तथास्तु’ थीम आणि नव्या नियमांसह ५० लाखांसाठी रंगणार महासंग्राम!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.