Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

मुंबई, डोंबिवलीत जैन मंदिरात चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्याला छापा टाकून केली अटक

भाविकाच्या वेशात मंदिरात येऊन एका भामट्याने हे चोरीचे कृत्य केल्याचे मंदिरांमधील सीसीटीव्ही चित्रणातून दिसून आले होते.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 25, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : मुंबई, डोंबिवली परिसरातील जैन मंदिरांच्या मध्ये सोवळ्यात दर्शनाच्या निमित्ताने जाऊन देव्हाऱ्यातील धार्मिक विधीसाठी लागणारा चांदीचा ऐवज चोरणाऱ्या सराईत चोरट्याला रामनगर पोलिसांनी गिरगाव मधील खेतवाडी भागातून अटक केली. मुंबईत नऊ पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर जैन मंदिरात चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. नरेश अगरचंद जैन (४७) असे आरोपीचे नाव आहे. तो मुंबईतील गिरगाव मधील खेतवाडी गल्ली चार मधील राधाकृष्ण इमारतीत राहतो. मागील आठवड्यात डोंबिवलीतील आदिनाथ गृह जिनालय (टाटा पॉवर लाईन), श्री पार्श्वगज जैन संघ मंदिर (रामनगर), शांतिलाल जैन मंदिरातून (मानपाडा) सकाळी १० ते पाच वेळेत देव्हाऱ्यातील चांदीची फुले, चांदीची लगड, चांदीचे ताट, आरती ताट, निरंजन, पंचपाळ, चांदीचा कलश, चांदीचा नारळ असा एकूण सोळाशे ग्रॅम वजनाचा ९५ हजार रूपये किमतीचा चांदीचा ऐवज चोरीला गेला होता. भाविकाच्या वेशात मंदिरात येऊन एका भामट्याने हे चोरीचे कृत्य केल्याचे मंदिरांमधील सीसीटीव्ही चित्रणातून दिसून आले होते. एकच भाविक या तिन्ही चोऱ्यात करत असल्याचे दिसून आले होते.

या तिन्ही चोऱ्या प्रकरणी भावीन अमृतलाल संगोई (४१, रा. टाटा पॉवर लाईन, मानपाडा रस्ता) यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, हवालदार सुनील भणगे, विशाल वाघ, सचीन भालेराव, हनुमंत कोळेकर, तुळशीराम लोखंडे, शिवाजी राठोड यांचे तपास पथक तयार करण्यात आले. पथकाने चोरीची तक्रार असलेल्या जैन मंदिरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यांना एकच चोर भाविकाच्या वेशात येऊन मंदिरात चोरी करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. तो गिरगाव खेतवाडी मधील रहिवासी होता. पोलिसांनी त्याच्या गिरगाव मधील घरी छापा टाकून आरोपी नरेश जैन याला अटक केली. त्याने आतापर्यंत मुंबईतील विविध जैन मंदिरांंमधून चांदीचा ऐवज लाखो रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. त्याच्यावर नऊ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून ८० हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

Previous Post

मराठा संघटनांची नवी मुंबईत जरांगे पाटील यांच्या दिंडी मोर्चासाठी जय्यत तयारी

Next Post

शाळकरी मुले नशेच्या विळख्यात; विद्यार्थ्यांच्या दप्तरांत नशेच्या गोळ्या, ड्रग्ज तस्करांकडून विद्यार्थीनींची छेडछाड

Next Post
शाळकरी मुले नशेच्या विळख्यात; विद्यार्थ्यांच्या दप्तरांत नशेच्या गोळ्या, ड्रग्ज तस्करांकडून विद्यार्थीनींची छेडछाड

शाळकरी मुले नशेच्या विळख्यात; विद्यार्थ्यांच्या दप्तरांत नशेच्या गोळ्या, ड्रग्ज तस्करांकडून विद्यार्थीनींची छेडछाड

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.