Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

जीटीबी ते वडाळादरम्यान मोनोरेल गाडी अचानक बंद, अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे ५८८ प्रवासी सुखरुप

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 15, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
जीटीबी ते वडाळादरम्यान मोनोरेल गाडी अचानक बंद, अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे ५८८ प्रवासी सुखरुप
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवर धावणारी मोनोरेल गाडी सोमवारी सकाळी तांत्रिक कारणामुळे बंद पडली. जीटीबी ते वडाळादरम्यान मोनोरेल गाडी बंद पडली असून या गाडीतील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. ही गाडी अद्याप रुळावर असल्याने मोनोरेलची सेवा विस्कळीत झाली आहे.

मुंबईत रात्रभर पाऊस सुरु असून सोमवारी सकाळी पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.अशात मोनोरेल मार्गिकेवर मोनोरेल गाडी बंद पडण्याची घटना पुन्हा घडली आहे. सकाळी जीटीबी ते वडाळादरम्यान मोनोरेल गाडी बंद पडली आहे. तांत्रिक कारणामुळे गाडी बंद पडली आहे. या गाडीतील प्रवाशांना तातडीने सुखरुप बाहेर काढत दुसर्या मोनोरेल गाडीने नजीकच्या स्थानकावर नेण्यात आले आहे. दरम्यान आॅगस्टमध्ये दोन मोनोरेल गाड्या बंद पडल्या होत्या. त्यातील एक गाडी दुसर्या मोनोरेल गाडीने खेचून नेण्यात महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाला (एमएमएमओसीएल) यश न आल्याने तब्बल दीड तास प्रवासी गाडी अडकले होते. अनेकांना यावेळी श्वास घेण्याचा त्रास झाला होता. मात्र अग्निशमन दलाने सतर्कता दाखवत गाडीचा दरवाजा तोडून ५८८ प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले होते. अग्निशमन दलामुळे मोठी दुर्घटना त्यावेळी टळली होती.या घटनेनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दोन उच्च पदस्थ अधिकार्यांना निलंबित केले असून या घटनेची चौकशी सुरु आहे.

Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

Next Post

पैसे दुप्पटच्या आमिषाने बदलापूरात साडेसात लाखांची फसवणूक

Next Post
पैसे दुप्पटच्या आमिषाने बदलापूरात साडेसात लाखांची फसवणूक

पैसे दुप्पटच्या आमिषाने बदलापूरात साडेसात लाखांची फसवणूक

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.