Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, सर्व चौपाट्या पर्यटकांसाठी बंद

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 19, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, सर्व चौपाट्या पर्यटकांसाठी बंद
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईमध्ये पावसाने जोर धरला असून पहाटेपासूनच देशाच्या आर्थिक राजधानीला पावसाने झोडपून काढलं आहे. सकाळपासून मुंबईला सूर्याचंही दर्शन झालेलं नसून जोरदार पावसामुळे लोकल ट्रेनच्या वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे. असं असतानाच आता मुंबईतून वाहणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक असलेल्या मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर दुसरीकडे भांडूप आणि विक्रोळीमध्ये दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेत महापालिकेने स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.

मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मिठी नदीतील पाणी पातळीने चार पूर्णांक सात मीटर इतका स्तर गाठला आहे. पावसामुळे लोकल ट्रेन्सबरोबरच रस्ते वाहतूक धीम्या गतीने होत आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेच्या घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला शीव, माटुंगा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पाणी भरल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. हार्बर मार्गावरील कुर्ला, टिळक नगर, गोवंडी स्थानकादरम्यान पाणी साचल्याने 20 ते 25 मिनिटे उशिराने लोकल धावत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर माहीम, माटुंगा रोड येथे पाऊसाचे पाणी भरल्याने लोकल कासव गतीने. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ईस्टर्न फ्री वे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

पावसाचा वाढता जोर लक्षात घेत मुंबईतील सर्व चौपाट्या पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. चौपाट्यांवर सामान्य लोकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतील जुहू बीच, वर्सोवा बीच, अक्सा बीच, गोराई बीच हे सर्व ठिकाणे रिकामी करण्यात आली आहेत. मरीन ड्राइव्ह, वरळी सी फेस, वांद्रे कार्टर रोड, मध आयलंड यासारख्या समुद्रकिनाऱ्यांवर लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उंच भरती आणि मुसळधार पावसाच्या धोक्यामुळे खबरदारीची पावले उचलण्यात आली आहेत.

Previous Post

मुंबईच्या डबेवाल्यांना २५ लाखांत ५०० चौरस फुटांचे मिळणार घर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Next Post

महाराष्ट्रातील निवडणुकांसंदर्भात मतदारांबद्दल चुकीची माहिती देऊन दिशाभूल; प्राध्यापक संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Next Post
महाराष्ट्रातील निवडणुकांसंदर्भात मतदारांबद्दल चुकीची माहिती देऊन दिशाभूल; प्राध्यापक संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

महाराष्ट्रातील निवडणुकांसंदर्भात मतदारांबद्दल चुकीची माहिती देऊन दिशाभूल; प्राध्यापक संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.