Lokrakshanay
Tuesday, September 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 25, 2026
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू झाले असले, तरी मतदारयादीच्या सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत असल्याची चिंता शिक्षक आणि संस्थाचालकांनी व्यक्त केली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत राज्यभर अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून, शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार वर्ग नियमितपणे सुरू करण्यात आले आहेत. मात्र, एसआयआर मोहिमेसाठी शासकीय आणि अनुदानित शाळांप्रमाणेच कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांचीही नियुक्ती झाल्याने अध्यापन आणि निवडणूकविषयक कामाचा ताळमेळ साधताना अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः अकरावीमध्ये प्रथमच महाविद्यालयीन शिक्षणाला सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रारंभीचे अध्यापन महत्त्वाचे असताना अनेक शिक्षक एसआयआरच्या कामात व्यस्त असल्यामुळे अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया विस्कळीत होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. परिणामी विद्यार्थी आणि पालकांना योग्य माहिती देणे, नियमित अध्यापन करणे आणि अभ्यासक्रमाचे नियोजन राखणे ही मोठी कसरत ठरत असल्याचेही संस्थांकडून सांगितले जात आहे.

मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. सचिन सानप यांनी सांगितले की, वाडिया महाविद्यालयात अकरावीचे वर्ग सुरू झाले असले तरी ५० टक्क्यांहून अधिक शिक्षक एसआयआरच्या कामात कार्यरत आहेत. एका बाजूला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह धरला जात असताना दुसऱ्या बाजूला शिक्षकांना लोकशाही प्रक्रियेशी संबंधित राष्ट्रीय कर्तव्यही पार पाडावे लागत आहे. त्यातच अनेक शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शैक्षणिक कामकाजावर आणखी ताण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत अध्यापन कसे करायचे आणि विद्यार्थी-पालकांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सेंट मीरा महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सुवर्णा देवळाणकर यांनीही ५० टक्के शिक्षक एसआयआरच्या कामात गुंतले असल्याचे सांगितले. उर्वरित अनुदानित व विनाअनुदानित तुकड्यांतील शिक्षकांच्या मदतीने अकरावीचे वर्ग सुरू ठेवले असून, काही शिक्षक ऑनलाइन माध्यमातून अध्यापन करत आहेत. मात्र, एसआयआरच्या जबाबदाऱ्यांमुळे नियमित शैक्षणिक कामकाज विस्कळीत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षकांच्या या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, यासाठी योग्य नियोजनाची गरज असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

 

Previous Post

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

Next Post

देशातील पहिला ‘चालता रस्ता’ महालक्ष्मीत; मेट्रो, मोनोरेल आणि लोकलचे एकाच ठिकाणी कनेक्शन

Next Post
देशातील पहिला ‘चालता रस्ता’ महालक्ष्मीत; मेट्रो, मोनोरेल आणि लोकलचे एकाच ठिकाणी कनेक्शन

देशातील पहिला 'चालता रस्ता' महालक्ष्मीत; मेट्रो, मोनोरेल आणि लोकलचे एकाच ठिकाणी कनेक्शन

BreakingNews

७ वर्षांची प्रतीक्षा संपली! ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील ३४२ कुटुंबांना लवकरच मिळणार हक्काचे घर

पंतप्रधानांच्या रौप्यमहोत्सवी सार्वजनिक कार्यकाळानिमित्त राज्यात विशेष मोहीम; ‘अंगणवाडी उत्सवासह’ आरोग्य शिबिरांवर भर

“पंतप्रधान मोदी शिर्डीत येईपर्यंत अन्न घेणार नाही”; साई पालखीला खांदा मिळण्यासाठी ६५ वर्षीय भक्ताचे उपोषण

चाकरमान्यांना गणेशोत्सवाच्या प्रवासात वाहतूक कोंडीचा फटका; कोकण हायवेवर वाहनांच्या रांगाच रांगा!

राज्यातील एसटी आणि ट्रॅव्हल्स चालकांची होणार अचानक ड्रग आणि मद्य तपासणी; काय आहे नवी मोहीम?

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त गणेश मंडळांना विशेष महाआरतीचे आवाहन; उत्कृष्ट सादरीकरणाला मिळणार रोख पारितोषिके

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.