Lokrakshanay
Tuesday, June 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

बाजार कर वसुली आता दुप्पट; पालिकेच्या तिजोरीत ४० कोटींची पडणार भर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 16, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
बाजार कर वसुली आता दुप्पट; पालिकेच्या तिजोरीत ४० कोटींची पडणार भर
Share on FacebookShare on Whatsapp

विरार : वसई विरार महापालिकेने बाजार कर उत्त्पन्न वाढीवर भर दिला आहे. कर वाढीसाठी २०२६-२८ या तीन वर्षांसाठी नव्याने ठेकेदार नियुक्त केले आहेत. नव्या ठेकेदारांसह कराच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. यामुळे पालिकेला ४० कोटी ४५ लाख रुपये इतके उत्पन्न मिळणार असून पालिकेच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. शहरातील वाढत्या प्रकल्पांवर होणारा खर्च आणि वर्षानुवर्षे थकलेली कराची वसुली यामुळे वसई विरार महापालिकेने उत्पन्नाचे विविध स्त्रोत विकसित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विविध मार्गाने उत्त्पन्न कसे वाढेल, याकडे पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी चालू वर्षात बाजार उत्पन्न करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वसई विरार शहरात दैनंदिन व आठवडी बाजार भरतात. या बाजारात मोठ्या संख्येने फेरीवाले विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी बसतात. तर काहीजण खाद्यपदार्थ विक्री करतात. या फेरीवाल्यांकडून महापालिका बाजार कर वसूल करते त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळते. सद्यस्थितीत महापालिकेच्या दप्तरी २५ बाजारांची नोंद असून त्यातील २ बाजार बंद आहेत.

बाजार कर उत्त्पन्नात वाढ व्हावी यासाठी तीन वर्षासाठी तीन ठेकेदार नियुक्त करून बाजार कर वसुली सुरू केली आहे. यापूर्वी महापालिकेला २०२५-२६ मध्ये ६ कोटी २३ लाख रुपये उत्त्पन्न मिळाले आहे. मात्र आता तीन वर्षासाठी जो ठेका काढला आहे त्यातून ४० कोटी ४५ लाख रुपये इतके उत्पन्न मिळणार आहे. यापूर्वी कराची जी रक्कम होती ती विना जीएसटी वसूल केली जात होती. मात्र, आता विविध महापालिकांच्या धोरणांचा अभ्यास करून नवीन बाजार कर धोरण निश्चित करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त ( बाजार विभाग ) अजित मुठे यांनी दिली आहे. प्रभाग समिती ए व सी चा ठेका राम कैलास यादव या ठेकेदाराला देण्यात आला असून या प्रभागातून ८ कोटी ९६ लाख ८७ हजार उत्पन्न मिळणार आहे. तर प्रभाग समिती बी, ई आणि एच चा ठेका आर.एस.एंटरप्रायझेस या ठेकेदाराला दिला असून ९४ कोटी ९१ लाख इतके उत्पन्न मिळणार आहे. तसेच प्रभाग समिती एफ, जी आणि आय चा ठेका के. इन्फ्रा या ठेकेदाराला देण्यात आला असून या प्रभागातून १६ कोटी ८४ लाख उत्पन्न पालिकेला मिळणार आहे. वसई विरार महापालिकेने २०२६ मध्ये बाजार करात वाढ केली आहे. पूर्वी पालिकेकडून ४० ते ५० रुपये इतका कर आकारला जायचा. पण, नव्याने लागू केलेल्या करत जीएसटी कर धरून आता ९० ते १०० रुपये फेरीवाल्यांना मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पालिकेकडून आकारण्यात येणारा कर अवाजवी असून तो रद्द करण्यात यावा अन्यथा फेरीवाल्यांकडून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मागील काही वर्षांपासून वसई विरार शहरात अनधिकृत आठवडी बाजारांचे पेव वाढत आहे.शहरात विविध ठिकाणी असे बाजार भरविले जात असल्याने वाहतूक कोंडी, अस्वच्छता यासह इतर समस्या निर्माण होऊ लागल्या आहे. मात्र अशा अनधिकृत बाजारांकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे.

Previous Post

१० दिवसात फुटपाथवरील झोपड्या हटवा; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला फटकारे

Next Post

हॅकरचा थेट पोलिसावरच डल्ला; विना ओटीपी व्यवहार झाल्याने बँक रडारवर!

Next Post
हॅकरचा थेट पोलिसावरच डल्ला; विना ओटीपी व्यवहार झाल्याने बँक रडारवर!

हॅकरचा थेट पोलिसावरच डल्ला; विना ओटीपी व्यवहार झाल्याने बँक रडारवर!

BreakingNews

शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी रायगडावर मनसे आक्रमक; स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेवरून आंदोलनाचा इशारा

व्यावसायिक गॅस सिलिंडर पुन्हा महागला; वर्षातील सलग सातवी दरवाढ!

मध्य रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमणांचा विळखा; १६ हजारांहून अधिक झोपड्यांनी व्यापली जागा!

लाडकी बहीण ई-केवायसीनंतर योजनेत ८१ लाख लाभार्थी अपात्र! सरकारचा दरमहा १२०० कोटींचा खर्च वाचणार

‘देऊळ बंद २’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; लवकरच येणार ‘मुळशी पॅटर्न २’

मुंबई महापालिकेची डिजिटल झेप; भारतातील पहिली एआय आधारित बांधकाम परवानगी प्रणाली सुरू

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.