Lokrakshanay
Sunday, April 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महिला शिक्षिकांना मासिक पाळीदरम्यान रजा द्यावी, महाराष्ट्रातील शिक्षक संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 29, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
महिला शिक्षिकांना मासिक पाळीदरम्यान रजा द्यावी, महाराष्ट्रातील शिक्षक संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मासिक पाळीदरम्यान होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास लक्षात घेऊन त्या काळात महिलांना रजा द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या राज्यात महिलांच्या आरोग्याविषयी संवेदनशीलता नसणे हा महिलांचा अपमान असल्याचेही संघटनेने म्हटले.

कर्नाटक सरकारने महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात रजा घेण्याचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कर्नाटक हे व्यापक धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्रात हा विषय केवळ चर्चेच्या पातळीवरच असल्याची टीका राज्य शिक्षक परिषदेने केली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दादा भुसे, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर आदींना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या देशातील सर्वात समृद्ध राज्य असले तरी महिलांच्या आरोग्यविषयक व संवेदनशील विषयावर अद्याप ठोस पाऊल उचललेले नाही. ही बाब महिलांचा अवमान करणारी असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले. मासिक पाळीच्या काळात महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात रजा देय ठरवून महिलांचा सन्मान करावा, अशी महिला शिक्षक कर्मचाऱ्यांची अपेक्षा असल्यामुळे त्यांनी त्या काळात रजा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

Previous Post

ठाणे शहरात ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी

Next Post

१८ रुपयाची सिगारेट आता ७२ रुपयांना! लवकरच धुम्रपान करणाऱ्यांना बसणार मोठा फटका

Next Post
१८ रुपयाची सिगारेट आता ७२ रुपयांना! लवकरच धुम्रपान करणाऱ्यांना बसणार मोठा फटका

१८ रुपयाची सिगारेट आता ७२ रुपयांना! लवकरच धुम्रपान करणाऱ्यांना बसणार मोठा फटका

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.