Lokrakshanay
Sunday, April 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

१८ रुपयाची सिगारेट आता ७२ रुपयांना! लवकरच धुम्रपान करणाऱ्यांना बसणार मोठा फटका

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 29, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
१८ रुपयाची सिगारेट आता ७२ रुपयांना! लवकरच धुम्रपान करणाऱ्यांना बसणार मोठा फटका
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : सिगारेट पिणं आता महागणार आहे. सरकारने यासंदर्भात नवीन कायद्याचा मसुदा तयार केला आहे. या नव्या कायद्यामुळे सिगारेटवरील एक्साइज ड्युटी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सध्या १८ रुपयांना मिळणारी सिगारेट ७२ रुपयांना मिळणार आहे. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. किंमत वाढवल्याने तरी लोक धूम्रपान सोडतील अशी अपेक्षा लोकांनी व्यक्त केली आहे. मात्र काहींनी व्यसनी लोक कितीही किंमत वाढवली तरी सिगारेट सोडणार नाही असं म्हटलं आहे.

‘रेडीट’वरील एका युझरने एक स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. यामध्ये लवकरच सिगारेटची किंमत वाढणार असल्याचं नमूद करण्यात आलंय. या व्यक्तीने यामुळे तरी माझी सिगारेटची सवय कमी होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. स्वत: धूम्रपान करत असूनही या व्यक्तीने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. “मी स्वत: धूम्रपान करणारा असूनही मी मला हा निर्णय आवडला आहे,” अशी कॅप्शन या व्यक्तीने दिली आहे. “यामुळे भारतामधील धूम्रपान करणाऱ्यांची संख्या कमी होईल अशी मी अपेक्षा करतो. खास करुन तरुण वर्ग आणि् विद्यार्थ्यांमधील धूम्रपान याने कमी होईल अशी अपेक्षा आहे. मी सुद्धा कदाचित यामुळे सिगारेट सोडेन,” असं या व्यक्तीने म्हटलंय. सध्याच्या केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा, १९४४ नुसार, सिगारेटच्या लांबी आणि प्रकारानुसार, प्रति एक हजार सीगारेटच्या काड्यांवर २०० ते ७३५ रुपयांपर्यंत उत्पादन शुल्क आकारले जाते. नवीन दुरुस्तीमध्ये या शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढीचा प्रस्ताव आहे. त्यानुसार प्रति एक हजार सिगारेटवरील शुल्क २७०० ते ११ हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे. चघळण्याच्या तंबाखूवरील शुल्क २५% वरून १००% पर्यंत, हुक्का तंबाखूवरील शुल्क २५% वरून ४०% पर्यंत वाढवलं जाणार आहे. पाईप आणि सिगारेटसाठीच्या धूम्रपान मिश्रणावरील शुल्कात ६०% वरून ३२५% पर्यंत मोठी वाढ होणार आहे.

Previous Post

महिला शिक्षिकांना मासिक पाळीदरम्यान रजा द्यावी, महाराष्ट्रातील शिक्षक संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post

महाराष्ट्रीय भाऊ प्रणित मोरेने मुंबईत घेतलं आलिशान घर

Next Post
महाराष्ट्रीय भाऊ प्रणित मोरेने मुंबईत घेतलं आलिशान घर

महाराष्ट्रीय भाऊ प्रणित मोरेने मुंबईत घेतलं आलिशान घर

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.