HEALTH TIPS | गेल्या काही काळात भारतात हृदयविकाराच्या झटक्यासारख्या समस्या तरुण वयातील लोकांना जास्त प्रभावित करताना दिसत आहेत. जसंजसं आपलं वय वाढत जातं, आपल्या शरीराचे, आरोग्याचे अनेक प्रॉब्लेम्स डोकं वर काढू लागतात. हे सामान्य असलं तरी कधी-कधी या समस्या तरूण वयातही होऊ शकतात व त्याचा तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.तसेच वयाच्या तिशीतच गुडघेदुखी किंवा सांध्यामधून कट-कट आवाजही येऊ लागतो.
मात्र या दुखण्याला सामान्य मानून त्याकडे दुर्लक्ष करणे हे भविष्यात खूपच जड जाऊ शकते. तरूण वयात हाडांचा असा प्रॉब्लेम होणे खूप धक्कादायक आहे. अशा वेळी गुडघ्यांमधील वंगण किंवा ग्रीस नैसर्गिकरित्या कसे वाढवावे ते जाणून घेऊया.
का येतो गुडघ्यामधून आवाज ?
एकेकाळी वृद्ध व्यक्ती या त्यांचे गुडघे किंवा सांधे दुखण्याची तक्रार करत असत. पण आता तर तरूणांनाही हा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार,
गुडघ्यांमधील ग्रीस किंवा वंगण कमी झाले की गुडघे दुखी वाढते किंवा कट कट आवाज येऊ लागतो. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली की असा त्रास होतो. हे ग्रीस कमी झाल्यामुळे त्यातून फक्त आवाजच येत नाही तर खाली बसताना- उठताना किंवा झोपतानाही त्या व्यक्तीला त्रास होतो. गुडघ्यांमधील हे वंगण वाढवण्यासाठी लोकं काही औषधांची किंवा इंजेक्शनची मदत घेतात, पण हे नैसर्गिकरित्याही वाढवता येऊ शकते.
आहारात करा हेल्दी पदार्थांचा समावेश
निरोगी राहाचे असेल तर त्यासाठी आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सकस आहाराचे रूटीन फॉलो करावे, पण त्यामध्ये सर्व मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतीलच असे नाही ना. तसेच ओमेगा ३ फॅटी ॲसिड असलेले पदार्थ खाण्याची सवय लावावी. या पौष्टिक तत्वांव्यतिरिक्त अँटी-ऑक्सीडेंट्स असलेले पदार्थही मुबलक खावेत. गुडघ्यांमधील ग्रीस वाढवण्यासाठी तुम्ही अक्रोड खाऊ शकता. पण ते मर्यादित प्रमाणातच खावेत.
कॅल्शिअमचे सेवन
शरीरात एकदा कॅल्शिअमची कमतरता निर्माण झाली तर ती भरून काढणे, खूप कठीण होते. नैसर्गिकरित्या कॅल्शिअम मिळवण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ खावेत. पण फुल क्रीमने बनवलेल्या पदार्थांचे जास्त सेवन करू नये. तसेच याशिवाय व्हिटॅमिन डीच्या सेवनासाठी काही वेळ उन्हातही बसावे.