Lokrakshanay
Friday, July 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

करमाळा पोलीस ॲक्शन मोडमध्ये! ७२ किलो गांजासह चौघांना ठोकल्या बेड्या!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 21, 2026
in गुन्हेगारी, पुणे
करमाळा पोलीस ॲक्शन मोडमध्ये! ७२ किलो गांजासह चौघांना ठोकल्या बेड्या!
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा परिसरातून पुणे शहरात गांजा विक्रीसाठी आलेल्या चौघांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून ७२ किलो गांजा, मोटार असा १९ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. केसनंद-वाडेबोल्हाई रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. भिवा कालीदास वाघमोडे (वय ३६), विष्णू भागवत वाघमोडे (वय २८), हरी श्रीपती ढवळे (वय ३२), मनोज अनिल सुरवसे (वय २९, चौघे मूळ रा. करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट सातचे सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे आणि पथक हे पुणे-अहिल्यानगर रस्ता परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी मोटारीतून चौघे जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी ऋषीकेश ताकवणे यांना मिळाली. केसनंद-वाडेबोल्हाई रस्ता परिसरात पोलिसांनी सापळा लावला. पोलिसांनी मोटार अडवली. मोटारीतील चौघांची चौकशी सुरू केली. मोटारीच्या डिक्कीत एका पोत्यात ५८ किलो गांजा असल्याची माहिती चौकशीत पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गांजा ठेवलेले पोते जप्त केले. आरोपींनी पुणे शहरात गांजा विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना दिली. आरोपीनी करमाळ्यातील घरात गांजा लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांचे पथक करमाळ्याला रवाना झाले. करमाळ्यातील धायखिंडी परिसरातील आरोपींच्या घरातून १४ किलो गांजा जप्त केला. पोलिसांनी या कारवाईत एकूण मिळून ७२ किलो गांजा, मोटार असा मुद्देमाल जप्त केला. आरोपी गांजा कोणाला विक्री करणार होते, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सातचे पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक निरीक्षक मदन कांबळे, सारंग दळे, ऋषीकेश ताकवणे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, निर्णय लांडे, विनायक साळवे, नेहा तापकीर, विनायक साळवे, नितीन घाडगे, बाळासाहेब तनपुरे यांनी ही कारवाई केली.

Previous Post

“आज भारतीय क्रिकेट संघात एकही मराठी..”, मराठी खेळाडूंच्या कमतरतेवर राज ठाकरेंच प्रश्नचिन्ह

Next Post

ठाणेनगरीत रामजन्माचा उत्साह! रामनवमीला ‘संगीत रामायण (हिंदी)’ चे विशेष आयोजन

Next Post
ठाणेनगरीत रामजन्माचा उत्साह! रामनवमीला ‘संगीत रामायण (हिंदी)’ चे विशेष आयोजन

ठाणेनगरीत रामजन्माचा उत्साह! रामनवमीला 'संगीत रामायण (हिंदी)' चे विशेष आयोजन

BreakingNews

जन्म-मृत्यू नोंदणीबाबत नवे निर्देश; २१ दिवसांत नोंदणी बंधनकारक!

महागाईचा बाप्पावरही परिणाम; गणेशमूर्तींच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांची वाढ!

HSRP नंबरप्लेटसाठी आता मुदतवाढ नाही; नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू – प्रताप सरनाईक

‘पीओपी’ गणेशमूर्ती विसर्जनाबाबत गेल्या वर्षीचीच पद्धत कायम ठेवण्याची राज्य सरकारची उच्च न्यायालयात विनंती

पावसाचा रेड-ऑरेंज अलर्ट फक्त कागदावरच? मुसळधार पावसातही रेनकोट-छत्रीसह विद्यार्थ्यांची उपस्थिती!

राज्यात मुसळधार पावसाचा कहर; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला रेड अलर्ट!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.