Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्धाटन स्थगित

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 27, 2025
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्धाटन स्थगित
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा शुभारंभाची नवी तारीख आता पुढे येत आहे. येत्या ३० सप्टेंबर रोजी या विमानतळाचे उद्धाटन होईल अशी चर्चा सुरुवातीला होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे उद्धाटनाची तारीख देखील बदलली गेल्याचे सांगितले जाते. मुंबईतील बहुचर्चित मेट्रो प्रकल्प आणि हे विमानतळ अशा दोन मोठ्या प्रकल्पांचे उद्धाटन येत्या आठ ॲाक्टोबर रोजी होईल अशी माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान उद्धाटनानंतरही हे विमानतळ सुरु होण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या काळात या भागातून बसवाहतूक तसेच आसपासच्या मास,मच्छि तसेच मटन विक्रेत्यांवर कारवाईसाठी विशेष मोहीम आखण्याचे आदेश नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेच्या आयुक्तांनी दिले आहेत. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम हा मुंबई महानगर प्रदेशातील एक सक्षम परिवहन उपक्रम मानला जातो. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचा शुभारंभ होत असताना एनएनएमटी प्रशासनाने या भागात कशाप्रकारे सुविधा देता येतील याची चाचपणी सुरु केली आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात याठिकाणी नागरिक, प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांची नेआण करण्याकरिता किमान ५० इलेक्ट्रीक बसेस तैनात करता येतील का याची चाचपणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. नवी मुंबई विमानतळ हे महापालिका क्षेत्राबाहेर असले तरी जेमतेम दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे महापालिका हद्दीस लागून उभ्या रहात असलेल्या या विमानतळ प्रकल्पास सोयीच्या ठरतील अशापद्धतीच्या सुविधांची आखणी महापालिकेमार्फत केली जात आहे. पहिल्या टप्प्यात एनएमएमटी ५० हून अधिक बसेस या भागात सोडण्याचा विचार करत आहे. या विमानतळावरुन प्रत्यक्ष विमानसेवा सुरु झाल्यानंतरच त्यासंबंधीचा विचार केला जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली. दक्षिण मुंबई, मुंबई अटल सेतू, दादर, चेंबूर, मानखुर्द, वाशी खाडीमार्गे विवीध बससेवा सुरु करता येतात का याची चाचपणी केली जात आहे. नवी मुंबईतील पाम बिच मार्गाच्या सक्षमीकरणाचा विचारही यानिमीत्ताने केला जात आहे, असे सुत्रांनी सांगितले.

Previous Post

कुर्ला ते कल्याणदरम्यान सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या दोन चोरट्यांच्या टोळीला अटक

Next Post

आत्महत्या की घातपात? डोंबिवलीत ११ मजल्यावरून २२ वर्षीय तरुणाने मारली उडी

Next Post
आत्महत्या की घातपात? डोंबिवलीत ११ मजल्यावरून २२ वर्षीय तरुणाने मारली उडी

आत्महत्या की घातपात? डोंबिवलीत ११ मजल्यावरून २२ वर्षीय तरुणाने मारली उडी

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.