Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आरोग्य व विज्ञान क्षेत्रातील नव्या कल्पनांना चालना देण्यासाठी, आयसीएमआरचा ‘शाईन’ उपक्रम!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 11, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
आरोग्य व विज्ञान क्षेत्रातील नव्या कल्पनांना चालना देण्यासाठी, आयसीएमआरचा ‘शाईन’ उपक्रम!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : देशातील तरुण पिढीला आरोग्यविज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनाकडे आकर्षित करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने अलीकडेच ‘शाईन’ (सायन्स अँण्ड हेल्थ इनोव्हेशन फॉर द नेक्सजेन एक्सप्लोरर्स) हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विज्ञान आणि आरोग्य संशोधनातील संधींबाबत जागरूकता निर्माण करून पुढील पिढीतील वैज्ञानिक, डॉक्टर आणि संशोधक घडवण्याचा यामागचा हेतू आहे. आयसीएमआरच्या अधिकृत माहितीनुसार, हा उपक्रम देशभरातील ९ वी ते १२ वी वर्गातील विद्यार्थी तसेच पदवीपूर्व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना उद्दिष्ट मानून राबवला जाणार आहे.

‘शाईन’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळा भेटी, संशोधकांशी संवाद, लघु संशोधन प्रकल्प, आणि विज्ञान-आरोग्य विषयक चर्चासत्रे यांची संधी मिळणार आहे. विज्ञान-आरोग्य क्षेत्रातील करिअर पर्याय, सार्वजनिक आरोग्य संशोधनातील आव्हाने, आणि नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोग्य समस्यांचे निराकरण अशा विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे आयसीएमआरच्या सूत्रांनी सांगितले. यासाठी देशभरातील विविध शाळांमध्ये जाऊनही प्रात्यक्षिके केली जात आहेत. प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे काम केले जाणार असून जास्तीत जास्त वैज्ञानिकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. जगभरात तंत्रज्ञान वेगाने वाढत आहे. एआयमुळे तर मोठी क्रांती आगामी काळात होणार असून यासाठी भारताने सज्ज राहाणे गरजेचे आहेय यासाठी पुढील पिढीला त्यासाठी तयार करणे गरजेचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Previous Post

खूनाच्या गुन्ह्यांत पोलिसांना दोन वर्ष गुंगारा देनारे आरोपी जेरबंद; कर्नाटकातून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Next Post

दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याची मागणी – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

Next Post
दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याची मागणी – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याची मागणी - परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.