डाळिंब : डाळिंब फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत हे तर आपण सगळेच जाणतो. खासकरुन डाळिंब, जेव्हापण शरीरात आयर्नची कमतरता निर्माण होते तेव्हा डॉक्टर एक डाळिंब खाण्याचा सल्ला देतात. डाळिंबाचे दाणे शरीरातील इतर समस्यांपासून लढण्यास मदत करतात. त्यामुळं रोज डाळिंबाचे दाणे खाणं फायदेशीर आहे.
डाळिंबामध्ये पॉलीफेनोल्स, व्हिटॅमिन सी आणि अन्य अँटी ऑक्सीडेंट्स असतात. जे शरीराला पोषकतत्व पुरवतात. तुम्ही जर रोज एक डाळिंबाचे सेवन केले तर आयर्नची कमतरता कमी होते. रोगप्रतिकार शक्ती वाढवते. डाळिंबाचे सेवन केल्याने काय होते, जाणून घेऊया.
रोगप्रतिकार शक्ती : डाळिंबामध्ये पॉलीफेनोल्स, व्हिटॅमिन सी आणि अन्य अँटी ऑक्सीडेंट्स असतात. जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही डाळिंबाचा ज्यूसदेखील पिऊ शकता.
हृदय : रोज डाळिंबाच्या दाण्याचे सेवन केल्यास हृदय निरोगी राहते. यात असलेले गुण कोलेस्ट्रोल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
उच्च रक्तदाब : तुम्हाला देखील उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तर तुम्ही दररोज एक डाळिंबाचे सेवन करायला हवं. यामुळं रक्तदाब नियंत्रणात राहतो.
पाचन : डाळिंबामध्ये फायबरची मात्रा चांगली असते. जी पचनासाठी फायदेशीर ठरते. जर तुम्हाला पाचनासंबंधी समस्या असेल तर तुम्ही डाळिंबाचा ज्यूसात काळे मीठ टाकून पिऊ शकता.
सूज : डाळिंबात अँटी इफ्लेमेटरी गुण असतात जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. तुम्ही डाळिंबाच्या ज्यूसदेखील पिऊ शकता.
त्वचा : रोज डाळिंबाचे सेवन केल्यास त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते. यात सुरकुत्या आणि चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास फायदेशीर गुणधर्म आहेत.
आयर्न : ज्या लोकांमध्ये रक्ताची कमतरता आहे त्यांनी दररोज डाळिंबाचे दाणे खावे. कारण डाळिंबात आयर्नचा चांगला स्त्रोत असतो.
स्मरणशक्ती : जर तुमची स्मरणशक्ती कमजोर असेल तर तुम्ही दररोज एक डाळिंबाचे सेवन करु शकता. यामुळं स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत मिळते.