Lokrakshanay
Thursday, July 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home कोकण

राज्यातील पावणेदोन लाख शिक्षकांचे एका दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन

या आंदोलनामुळे राज्यभरातील ४० हजार शाळा आज बंद राहतील.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 25, 2024
in कोकण, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
राज्यातील पावणेदोन लाख शिक्षकांचे एका दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन
Share on FacebookShare on Whatsapp

कोकण प्रतिनिधी : विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षक आज एका दिवसाचे सामूहिक रजा आंदोलनावर जाणार आहेत. राज्यभरातील जवळपास पावणेदोन लाख शिक्षक या आंदोलनात सहभागी होणार असून अंदाजे ४० हजार शाळा आज बंद राहतील.

राज्‍यातील 2 लाख विद्यार्थ्‍यांचे शैक्षणिक भवितव्य आंधारात येणार आहे. राज्‍यात सुधारीत शिक्षक संच मान्‍यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्‍या निर्णयाची अंमलबजावणी करण्‍याची भूमिका राज्‍य सरकारने घेतली आहे. याला राज्‍यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला आहे.

सुधारीत शिक्षक संच मान्‍यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्‍या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्‍यास राज्‍याच्‍या ग्रामीण भागातील 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29 हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्‍य अंधारात जाण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. शासनाने हे दोन्‍ही निर्णय रद्द करावेत यासाठी राज्‍यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्‍या आहेत. या संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. मात्र कुठलाच ठोस निर्णय शासनाने घेतला नाही. त्यामुळे सर्व शिक्षक आंदोलनात उतरलेत.

कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती, विद्यार्थ्यांना गणवेश न मिळणे, अध्यापन सोडून करावी लागणारी प्रशासकीय कामे अशा विविध मुद्द्यांवर राज्यातील शिक्षक आज आंदोलन करणार आहेत. शिक्षक संघटनातर्फे राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्यातील काही ठिकाणी शाळा बंद राहणार आहेत.

दरम्यान, शिक्षण विभागाच्या निर्णयाविरोधात प्राथमिक शिक्षकांची काही दिवसांपूर्वी पुण्यात बैठक झाली. यात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असलेले व्हॉट्सअॅप ग्रुप सोडणे, काळी फित लावून काम करणे, अशाप्रकारचे विरोध दर्शवण्यात आले होते. मात्र, आता शिक्षकांनी एक दिवसांची रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. त्याचा परिणाम राज्यातील बहुतांश शाळेंवर पोहणार आहे.

Previous Post

पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Next Post

रोज न चुकता खा एक डाळिंब ; डाळिंबाचे सेवन केल्याने काय होते, जाणून घेऊया…

Next Post
रोज न चुकता खा एक डाळिंब ; डाळिंबाचे सेवन केल्याने काय होते, जाणून घेऊया…

रोज न चुकता खा एक डाळिंब ; डाळिंबाचे सेवन केल्याने काय होते, जाणून घेऊया...

BreakingNews

कोपरी-पाचपाखाडीत मतदार पुनरिक्षण मोहिमेला वेग; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘Enumeration Form’चे वाटप

मुंबईत नवा सागरी मार्ग उभारणार; वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १.८७ किमीचा प्रकल्प!

ठाण्यात FDAची मोठी कारवाई; गुजरातमधून आणला जाणारा २ ते ३ टन संशयित भेसळयुक्त मावा जप्त!

विसर्जित पीओपी गणेशमूर्तींपासून ७६० अभ्यास टेबल; नवी मुंबई महापालिकेचा पर्यावरणपूरक उपक्रम!

ज्येष्ठ रंगदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन; मराठी रंगभूमीतील सुवर्णपर्वाचा अस्त!

१८ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.