Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

घोडबंदरवासियांचे वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी घेतली तातडीने बैठक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 17, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
घोडबंदरवासियांचे वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी घेतली तातडीने बैठक
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा सर्व यंत्रणांची बैठक घेवून घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, असे आदेश सर्व यंत्रणांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर घोडबंदर-गायमुख रस्त्यासह जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आता ठाणे जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित विभागांची तातडीची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत मीरा भाईंदर पोलीस आयुक्त निकीत कौशिक, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाठ, अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, पालघरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, महानगरपालिका, आरटीओ, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही अधिकारी प्रत्यक्ष तर काही अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

वाहतूक कोंडीच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. जेएनपीटी आणि अहमदाबाद हायवे-पालघरकडून येणाऱ्या अवजड वाहनांसाठी पार्किंग लॉट किंवा ‘होल्डिंग प्लॉट्स’ निश्चित करण्यावर भर देण्यात आला. शहरातील मुख्य मार्गांवरून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी विशिष्ट वेळेचे नियोजन (Time Zone) निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. घोडबंदर रोड, माजिवडा जंक्शन, भिवंडी बायपास, चिंचोटी, शिळफाटा आणि कल्याण बायपास यांसारख्या सतत वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आणि ते सुस्थितीत ठेवण्याची सूचना देण्यात आली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर, वाहतूक नियंत्रण आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व सुलभ होण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला. या बैठकीमुळे जिल्ह्यातील वाहतूक कोंडीवर लवकरच तोडगा निघेल आणि नागरिकांना सुलभ प्रवास करता येईल, यासाठी नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

Previous Post

आचार्य अत्रे चौक ते कफ परेड मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Next Post

ठाणे जिल्हा प्रशासनाची महत्त्वाकांक्षी मोहीम ‘सेवा पंधरवडा’; सामान्य जनतेची कामे वेगवान

Next Post
ठाणे जिल्हा प्रशासनाची महत्त्वाकांक्षी मोहीम ‘सेवा पंधरवडा’; सामान्य जनतेची कामे वेगवान

ठाणे जिल्हा प्रशासनाची महत्त्वाकांक्षी मोहीम ‘सेवा पंधरवडा’; सामान्य जनतेची कामे वेगवान

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.