Lokrakshanay
Tuesday, August 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

महापालिका क्षेत्रातील बेकायदा नळजोडण्यांवर धडक कारवाई

दिवा आणि मुंब्रा भागातील ९७ बेकायदा नळजोडण्या तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 11, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
महापालिका क्षेत्रातील बेकायदा नळजोडण्यांवर धडक कारवाई
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : महापालिका क्षेत्रातील बेकायदा नळजोडण्या खंडीत करण्याची विशेष मोहिम प्रशासनाने हाती घेतली असून यामध्ये दिवा आणि मुंब्रा भागातील ९७ बेकायदा नळजोडण्या तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. हि मोहिम यापुढेही सुरूच राहणार असल्यामुळे बेकायदा नळजोडणीधारकांचे धाबे दणाणले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवरून बेकायदा नळजोडण्या घेण्यात येतात. त्याचा परिणाम शहरातील पाणी वितरण व्यवस्थेवर होऊन टंचाईची समस्या निर्माण होते. या टंचाईच्या झळा नियमित पालिकेची देयके भरणाऱ्या नळजोडणीधारकांना बसतात. याविरोधात तक्रारी येऊ लागताच पालिका प्रशासनाने आता अशा बेकायदा नळजोडण्या खंडीत करण्याची कारवई सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात, पाणी देयक वसुलीबाबत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता आणि मीटर रिडर यांची बैठक घेतली. या बैठकीत, मीटर रीडरना साप्ताहिक उद्दीष्ट निश्चित करून देण्यात आले. तसेच, अवैध नळ संयोजने खंडित करण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

अनधिकृत इमारतींमध्ये पाण्याचा वापर सुरू असल्यास त्यावरही गुन्हे दाखल करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत. या आदेशानंतर पाणी पुरवठा विभागाने मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील भोलेनाथ नगर, खरीवली, देवी नाला, ग्रीन पार्क येथील एक इंच व्यासाच्या ९७ बेकायदा नळ जोडण्या खंडित केल्या आहेत. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये कल्याण फाटा येथून ६६० मीमी आणि ३५० मीमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमधून दररोज सुमारे ५७ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा करण्यात येतो. या मुख्य जलवाहिनीवर काही नागरिकांनी बेकायदा नळ जोडण्या घेतल्याचे निर्दशनास आले होते. या नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली आहे. अशाचप्रकारे संपूर्ण महापालिका क्षेत्रात बेकायदा नळ जोडण्या खंडीत करण्यात येणार असल्याचे उपनगर अभियंता (पाणीपुरवठा) विनोद पवार यांनी सांगितले.

Previous Post

गणेश चतुर्थीचा क्रेझ: बाजारपेठा खचाखच भरल्या, कार्यकर्ते सक्रिय! चैतन्योत्सव संपूर्ण शहरात चमकला!

Next Post

पुणे-नागपूर प्रवासाचा कायापालट करणारा क्रांतिकारी समृद्धी महामार्ग प्रकल्प

Next Post
पुणे-नागपूर प्रवासाचा कायापालट करणारा क्रांतिकारी समृद्धी महामार्ग प्रकल्प

पुणे-नागपूर प्रवासाचा कायापालट करणारा क्रांतिकारी समृद्धी महामार्ग प्रकल्प

BreakingNews

लोणावळा ग्रामीणमध्ये गांजाची तस्करी उघड; ८.५ किलो गांजासह तरुणाला अटक

लग्नसमारंभ, मिरवणुकांमध्ये पार्टी पॉपरवरील प्लास्टिक कन्फेटीवर बंदीची मागणी

“मराठी बोलताच आली पाहिजे!” १५ ऑगस्टनंतर रिक्षा-टॅक्सी चालकांची होणार परीक्षा – मंत्री सरनाईकांचा इशारा

ठाणे महापालिकेत ‘बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमाचा शुभारंभ; विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्लास्टिकमुक्तीची जनजागृती

११ ऑगस्टपासून दुधाचे दर कडाडणार! दुधासह दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार

SIR अंतर्गत मतदार गणनाअर्ज भरण्याची १७ ऑगस्ट हीच अंतिम तारीख!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.