Lokrakshanay
Saturday, April 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुणे-नागपूर प्रवासाचा कायापालट करणारा क्रांतिकारी समृद्धी महामार्ग प्रकल्प

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पुणे ते शिरुळ दरम्यान ५३ किलोमीटर लांब सहा पदरी फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 11, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
पुणे-नागपूर प्रवासाचा कायापालट करणारा क्रांतिकारी समृद्धी महामार्ग प्रकल्प
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : महाराष्ट्रातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानंतर मुंबईवरुन थेट नागपूर प्रवास आठ तासांवर येणार आहे. आता पुणे शहराला समृद्धी महामार्गाने जोडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पुणे ते शिरुळ दरम्यान ५३ किलोमीटर लांब सहा पदरी फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहे. त्यानंतर अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर माध्यमातून पुणे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गासाठी उभारण्यात येणारा फ्लायओव्हर केसनंद गावातून सुरु होणार आहे. हा मार्ग शिरूरपर्यंत जाणार आहे. या फ्लायओव्हरच्या निर्मितीसाठी ७५१५  कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच फ्लायओव्हार अहमदनगरवरुन समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी अतिरिक्त २०५० कोटी खर्च येणार आहे. यामुळे या प्रकल्पाचा एकूण खर्च ९५६५ कोटींवर जाणार आहे. पुणे ते समृद्धी महामार्गपर्यंतचा रस्ता २५० किलोमीटर असणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत समृद्धी महामार्ग पुणे ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत जोडण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पुणे से छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय राजमार्ग आतापर्यंत ‘एनएचएआय’ कडून बनवला जात होता. तो आता ‘एमएसआयडीसी’ कडून तयार केला जाणार आहे. यासाठी एप्रिल महिन्यात ‘एमएसआयडीसी’ सोबत करार झाला होता. या मार्गामुळे केवळ पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान चांगला संपर्क होणार नाही तर या भागातील आर्थिक आणि सामाजिक विकास होणार आहे. पीडब्ल्यूडी विभागातील अधिकाऱ्यानुसार, पीडब्ल्यूडी आणि महाराष्ट्र सरकार दोन वर्षांत हा प्रकल्प सुरु करण्यासाठी सर्व उपाययोजना करणार आहे. तसे झाले नाही तर एमओआरटीएच हा प्रकल्प आपल्या हातात घेईल. समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डीपर्यंत झाला होता. त्याचे उद्धघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर दुसरा टप्पा शिर्डी ते इगतपुरी तालुक्यातील भर्वीरपर्यंत सुरु झाला. मुंबई नागपूर एक्स्प्रेस वेचा तिसरा आणि अंतिम टप्पा २०२४ च्या अखेरीस सार्वजनिक वापरासाठी पूर्णपणे खुला होईल.

Previous Post

महापालिका क्षेत्रातील बेकायदा नळजोडण्यांवर धडक कारवाई

Next Post

लाइफ सेव्हिंग हेलिकॉप्टर : आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांतून गर्भवती महिलेचा जीव बचावला

Next Post
लाइफ सेव्हिंग हेलिकॉप्टर : आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांतून गर्भवती महिलेचा जीव बचावला

लाइफ सेव्हिंग हेलिकॉप्टर : आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांतून गर्भवती महिलेचा जीव बचावला

BreakingNews

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.