Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे ग्राहकांची फसवणूक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 6, 2025
in Uncategorized, गुन्हेगारी, नवी मुंबई
बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे ग्राहकांची फसवणूक
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : ठाणे आणि कल्याण डोंबिवली परिसरात बनावट रेरा प्रमाणपत्र सादर करत शेकडो खरेदीदारांच्या फसवणुकीची प्रकरणे ताजी असताना आता नवी मुंबईतही बोगस बांधकाम परवानगी तसेच भोगवटा प्रमाणपत्र तयार करून ग्राहकांना गंडा घातला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोठीवली गाव परिसरात महापालिकेच्या नगररचना विभागाचे बनावट प्रमाणपत्र बनवून बेकायदा इमारतींमधील सदनिकांची विक्री सुरू असल्याच्या अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. महापालिकेने यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असला तरी ऐरोली, घणसोली, दिघा विभाग कार्यालयांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अशाप्रकारे बेकायदा बांधकामे आणि बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे ग्राहकांची फसवणूक सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. बेसुमार पद्धतीने सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांमुळे ठाणे तसेच डोंबिवलीसारखी शहरे यापूर्वीच बदनाम झाली आहेत.

नवी मुंबईतील काही ठराविक गावांलगत असलेल्या सिडको तसेच खासगी मालकीच्या मोकळ्या जागा बळकावून सर्रास बेकायदा बांधकामे करणारी एक मोठी टोळी गेल्या काही वर्षात सक्रिय आहे. ऐरोली, दिघा, घणसोली, कोपरखैरणे यासारख्या उपनगरांमध्ये तर या बांधकामांना आता धरबंद राहिलेला नाही. विद्यमान महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या दिव्यातील प्रकरणानंतर तर सर्व विभाग अधिकाऱ्यांना अशी बांधकामे रोखण्याचे सक्त आदेश दिले. त्यानंतरही ऐरोली, दिघा, घणसोली विभाग कार्यालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अशी बांधकामे सुरूच आहेत. गोठीवली परिसरातील अशाच एका प्रकरणात महापालिकेच्या नगररचना विभागाची बनावट प्रमाणपत्र सादर करुन ग्राहकांची फसवणूक केली गेल्याचे उघडकीस आले आहे. नगररचना विभागाची बांधकाम परवानगी तसेच काही इमारतींचे बोगस भोगवटा प्रमाणपत्र तयार करुन इमारतीमधील सदनिकांची विक्रि सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंबंधी महापालिकेच्या नगररचना विभागाने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.

Previous Post

गिग कामगारांच्या विविध समस्या सोडवणार – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

Next Post

उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर कुरेशी समाज संघटनांचा संप मागे

Next Post
उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर कुरेशी समाज संघटनांचा संप मागे

उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर कुरेशी समाज संघटनांचा संप मागे

BreakingNews

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.