मुंबई : खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक १२०३/२०२५ कलम १०९ ३५१(३), ४९, ३(५) भारतीय न्याय सहिता स .ह कलम ४, २५ शस्त्र अधिनियम सह कलम ३७(१), १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये आरोपीच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील जखमी नामे हेमंत दलाल व आरोपी रोशन रमेश पाटील उर्फ सिंग यांचे मध्ये निरा-व्हिला बिल्डिंग, रेल्वे स्टेशन समोर, खार पश्चिम या प्रॉपर्टी वरून वाद असून दि. २४ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास हेमंत दलाल हे वर नमूद प्रॉपर्टी च्या ठिकाणी गेले असता आरोपी नामे रोशन रमेश पटेल उर्फ सिंग याचे सोबत वाद झाल्याने आरोपीने त्यांना बांबूने मारहाण केली व घरातून कोयता आणून जखमी नामे हेमंत दलाल यांना जीवे ठार मारण्याकरिता त्यांचेवर वार करीत असताना त्यांचे भांडणाचा आवाज ऐकून खार रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या पोलीस चौकीवर कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार क्र११३५४०/ अनिल दत्तू जाधव यांनी तेथे तात्काळ येऊन आरोपी रोशन रमेश सिंग हा हेमंत दलाल यांचे डोक्यावर कोयताचा वार करीत असताना त्याचा कोयत्याचा वार त्याचे पोलीस लाठीवर घेऊन त्यास जखमी हेमंत दलाल यांचे पासून बाजूला लोटून त्यास हत्यारासह तात्काळ ताब्यात घेतले. सदरची माहिती दिवस पाळी पर्यवेक्षक व वरिष्ठांना दिली व आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देऊन जखमीला तात्काळ खार १ मोबाईल च्या स्टाफ च्या मदतीने भाभा हॉस्पिटल येथे पुढील उपचारा कामी भरती करून त्यांना वेळेत उपचार उपलब्ध करून दिला. फिर्यादी गंभीर जखमी झालेला असुन त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. पो.शि. अनिल जाधव यांच्या कर्तव्य तत्परतेमुळे व त्यांच्या धाडसामुळे जखमीचे प्राण वाचले असुन आरोपी देखील गजाआड झालेला आहे.यामुळे पोशि अनिल जाधव यांचे अभिनंदन केले जात आहे.

