Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महापालिकेच्या शाळांमध्ये भगवद्गीता पठण करावे – भाजपच्या माजी नगरसेविकेची मागणी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 15, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
महापालिकेच्या शाळांमध्ये भगवद्गीता पठण करावे – भाजपच्या माजी नगरसेविकेची मागणी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धर्माच्या नावाने राजकारण सुरू झाले असून मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये भगवद्गीता पठण करण्याची जुनीच मागणी भाजपच्या नगरसेविकेने पुन्हा एकदा केली आहे. महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी याबाबतची ठरावाची सूचना मंजूर झाली होती. त्याची गेल्या तीन वर्षात अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे सभागृहाच्या ठरावानुसार महापालिकेच्या सर्व शाळांमधून भगवद्गीता पठण करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला द्याव्यात अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविकेने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

मालाडमधील भाजपच्या माजी नगरसेविका योगिता कोळी यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिकेच्या शाळांमधून भगवद्गीता पठण केले जावे जेणेकरुन भावी पिढीवर योग्य संस्कार होतील, अशा प्रकारची ठरावाची सूचना मांडली होती. पालिकेची मुदत संपण्याच्या काही दिवस आधी झालेल्या पालिका महासभेत ही ठरावाची सूचना मंजूर झाली होती. मात्र त्यानंतर पालिका संपुष्टात आली व नंतर तीन वर्षे पालिकेची निवडणूकच झालेली नाही. त्यामुळे हा विषय मागे पडला होता. दरम्यान, योगिता कोळी यांनी मार्च २०२३ मध्ये तत्कालिन पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना महापालिका शाळांमध्ये भगवद्गीता पठण करण्याबाबत पत्र दिले होते.

Previous Post

राज्यात ६० ठिकाणी ‘स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क’ उभारणार! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Next Post

थंडीत रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घरगुती रामबाण उपाय

Next Post
थंडीत रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घरगुती रामबाण उपाय

थंडीत रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घरगुती रामबाण उपाय

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.